|Wednesday, January 16, 2019
You are here: Home » मनोरंजन » हंपीसाठी सोनालीचा स्पेशल हेअर कट

हंपीसाठी सोनालीचा स्पेशल हेअर कट 

प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्री आपली भूमिका अधिक प्रभावी होण्यासाठी खास प्रयत्न करतात. कोणी वजन वाढवतं, कुणी वजन कमी करतं, कुणी सिक्स पॅक ऍब्ज करतात, तर कुणी आपल्या लुकवर लक्ष देतात. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने प्रकाश कुंटे दिग्दर्शित आगामी ‘हंपी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी स्पेशल हेअर कट केला आहे. तिच्या या हेअर कटने तिचा लुकच बदलला आहे. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवफत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चौतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेनं आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे. वेगळा लुक मिळाल्याने सोनालीही खूश होती. आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके शॉर्ट केले नव्हते. त्यामुळे इतके शॉर्ट करावे असं वाटतही नव्हतं. माझ्या या भूमिकेसाठी केस शॉर्ट असावेत, ही प्रकाशचीच आयडिया होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळं दिसावं अशी त्याची अपेक्षा होती. माझी भूमिका, ईशा ही टॉम बॉय आहे. तिच्या आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पहायला मिळेल. ही भूमिका साकारता खूप मजा आली, असं सोनालीनं सांगितलं.

सोनालीच्या लुकविषयी प्रकाश म्हणाला, सोनालीच्या आजवरच्या भूमिकांचा प्रभाव या भूमिकेवर नको होता. त्यामुळे तिचा लुक बदलणं महत्त्वाचं होतं. तिला गर्ल नेक्स्ट डोअर असा लुक द्यायचा विचार होता. त्यासाठी शॉर्ट केस आणि चष्मा असा लुक समोर आला. सोनालीनेही त्यासाठी तयारी दाखवली आणि आमचं काम सोपं झालं. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी सोबत अभिनेत्री प्राजक्ता माळी, अभिनेता प्रियदर्शन जाधव, ललित प्रभाकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. येत्या 3 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Related posts: