|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » वॅटफोर्डचा अर्सेनलला पराभवाचा धक्का

वॅटफोर्डचा अर्सेनलला पराभवाचा धक्का 

वृत्तसंस्था/ वॅटफोर्ड

प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात वॅटफोर्डने अर्सेनलची विजयी घोडदौड रोखली. टॉम क्लेव्हर्लीच्या दुसऱया आणि निर्णायक गोलाच्या जोरावर वॅटफोर्डने अर्सेनलचा 2-1 अशा गोल फरकाने नाटय़मयरित्या पराभव केला.

अर्सेनलने सामन्याच्या पूर्वार्धात मर्टेसॅकेरच्या गोलवर खाते उघडले पण सामन्याच्या उत्तरार्धात ट्रॉय डिने आणि क्लेव्हर्ली यांच्या शानदार गोलांच्या जोरावर वॅटफोर्डने अर्सेनलचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले. अर्सेनलने यापूर्वी या स्पर्धेत सलग चार सामने जिंकले होते. विविध फुटबॉल स्पर्धामधील झालेल्या आठ सामन्यातील अर्सेनलचा हा पहिला पराभव आहे. स्पर्धेच्या गुणतक्त्यात मँचेस्टर युनायटेड, सिटी पहिल्या स्थानावर असून अर्सेनल 9 गुणांच्या पिछाडीने दुसऱया स्थानावर आहे. शनिवारच्या सामन्यातील विजयामुळे वॅटफोर्ड चौथ्या स्थानावर आहे.