|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » दिल्लीची तनिशा काश्यप विजेती

दिल्लीची तनिशा काश्यप विजेती 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दिल्लीची महिला टेनिसपटू तनिशा काश्यपने येथे झालेल्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत 16 वर्षाखालील एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत अजय मलिकने 14 वर्षाखालील मुलांच्या एकेरीचे जेतेपद स्वत:कडे राखले.

मुलींच्या 16 वर्षाखालील वयोगटाच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात दिल्लीच्या 15 वर्षीय तनिशाने जम्मू-काश्मीरच्या प्रिंकलवर 6-1, 6-4 अशी मात करत विजेतेपद मिळविले. मुलांच्या 14 वर्षाखालील वयोगटाच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात अजय मलिकने हरियाणाच्या कृष्णा हुडाचे आव्हान 7-5, 4-6, 6-2 असे संपुष्टात आणले. मुलींच्या 14 वर्षाखालील वयोगटातील एकेरीचे विजेतेपद संदीप्ती सिंग रावने पटकाविताना ऋतुजा चाफळकरचा 6-1, 6-1 असा पराभव केला.

Related posts: