|Thursday, April 26, 2018
You are here: Home » Top News » सोमालियात भीषण स्फोट , तीनशे हून अधिक नागरिकांचा मृत्यू

सोमालियात भीषण स्फोट , तीनशे हून अधिक नागरिकांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सोमालिया :

सोमालियात झालेल्या भीषण स्फोटात तीनशे हुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. रविवारी राजधानी मोगादिशूमध्ये एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला.

हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150मीटरच्या परिघात उपस्थित नागरिकही मृत्यूमुखी पडले. सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात जखमींची संख्याही 300 हून जास्त आहे. ढिगाऱयांखालील मृतदेह उपसण्याचे काम सुरू असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची चिन्हे आहेत. जगभरात गेल्या काही वर्षात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांपैकी हा सर्वात भीषण मानला जात आहे. सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठय़ा प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला. यामुळे अनेक लोकांचा बळी गेला.

 

Related posts: