|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मध्यरात्रीनंतर वाहनांची सुटका

मध्यरात्रीनंतर वाहनांची सुटका 

आपत्कालीन यंत्रणा फेल : रामघाटात मोठय़ा प्रमाणात दरडींची माती

वार्ताहर / दोडामार्ग:

शनिवारी सायंकाळी वीजघर परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे वीजघरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रथमच तिलारी घाटात दरडी कोसळल्या. डोंगरातील माती वीजघर येथील ग्रामस्थांच्या घरापर्यंत आली. रात्री उशिरापर्यंत
ग्रामस्थांच्या पुढाकाराने काही भागातील मातीचे ढिगारे उपसण्यात आले तरी हा घाट उशिरापर्यंत व्यवस्थित सुरू झाला नव्हता. या घटनेने तालुक्याच्या आपत्कालीन यंत्रणेचा सुशेगाद कारभार पुढे आला आहे.

शनिवारी सायंकाळी ढगफुटीसारखा कोसळलेल्या पावसाने दोडामार्गबेळगाव मार्गावरील रामघाट वीजघर येथे सायंकाळी 5.30 च्या सुमारास दरड कोसळली. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दोडामार्ग आपत्कालीन कक्षाचा एकही कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती. रात्री 11.30 वाजता जि. . सदस्य राजन महापसेकर, अमित गाड, तुळशीदास नाईक, इसाक खेडेकर, बंटी टोपले, संदेश राणे, अमित राणे केंद्रे ग्रामस्थांनी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने एका बाजूने माती बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करत अडकलेल्या एसटी, खासगी गाडय़ांची सुटका करून रात्री 2.30 वाजता रस्ता मोकळा केला.

आपत्कालीन कक्ष आहे कशाला?

रामघाट वीजघर येथे रस्त्यावर कोसळलेल्या दरडी स्थानिक ग्रामस्थ राजकीय पदाधिकाऱयांनी बाजूला करत रात्री 2.30 वाजता रस्ता मोकळा करत अडकलेल्या गाडय़ांची सुटका केली. मात्र, दोडामार्ग आपत्कालीन कक्ष मात्र सुशेगाद होता. हेवाळे सरपंच संदीप देसाई यांनी मंत्रालयात फोन लावून राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला कल्पना दिली. त्यानंतर सूत्रे हलताच उपविभागीय अभियंता विजय चव्हाण यांनी आपले कर्मचारी पाठविले. तहसीलदार रोहिणी रजपूत तेथे दाखल झाल्या. मात्र, तोवर स्थानिक ग्रामस्थांनी दरड बाजूला करण्याचे काम हाती घेतले होते. रात्रभर घाटात अडकलेल्या प्रवाशांनी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या आपत्कालीन कक्षाबाबत नाराजी व्यक्त केली. आपत्कालीन कक्ष तालुक्यात आहे तरी कशाला, असा प्रश्न उपस्थित केला.

सहा ग्रामस्थांच्या घरात चिखल

शनिवारी जोरदार झोडपून काढलेल्या पावसाने वीजघर येथे कोसळलेल्या दरडी खालील भागात असलेल्या पेंद्रे गावातील सहा ग्रामस्थांच्या घरात पाणी चिखल साचला. गणपत कृष्णा गवस, मधू मालू गवस, तुकाराम रामा गवस, वासू कृष्णा गवस, भरत तुकाराम गाड आणि गोकुळा रामजी गावडे यांच्या घरात पाणी चिखल साचला. त्यामुळे शनिवारची रात्र त्यांना बसून काढावी लागली.

बांधकाम, वनविभागाने हात झटकले

शनिवारी वीजघर येथे घडलेल्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम वनविभागालाकल्पना दिली होती. मात्र, सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी वनविभागाने तर दरड बाजूला काढण्याची आमची जबाबदारी नाही. त्यामुळे तेथे आम्ही येणार नाही, असे सांगितले. वनविभागाचे कर्मचारी म्हणाले, ती जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. आमचे त्याच्याशी काही देणेघेणे नाही.

Related posts: