|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » रामदेव बाबांना विमानतळावर भेटून चूक केली : प्रणव मुखर्जी

रामदेव बाबांना विमानतळावर भेटून चूक केली : प्रणव मुखर्जी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

2011मध्ये यूपीए 2 च्या कार्यकाळात विमानतळावर जाऊन योगगुरू रामदेव बाबंची भेट घेणे आपली चुक होती अशी कबुली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडियना एक्सप्रेसच्या ‘एक्सप्रेस अड्डा’कार्यक्रमात दिली. यूपीए 2च्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे केंद्रीय मंत्री होते. प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे 2011मध्ये दिल्ली विमनातळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते.

प्रणव मुखर्जी आणि कपिल सिब्बल हे 2011मध्ये दिल्ली विमानतळावर रामदेव बाबांना उपोषण न करण्याची विनंती करण्यासाठी गेले होते. एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले , हा आमचा चुकीचा निर्णय होता. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे यूपीए सरकार अडचणीत आले होते. त्यामुळे रामदेव बाबांनी उपोषण करण्यापूर्वीच हे प्रकरण मिटवायचे होते, असे ते म्हणाले.

 

Related posts: