|Thursday, January 17, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » चक्क पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस

चक्क पोलिस स्टेशनमध्ये साजरा केला तक्रारदाराचा वाढदिवस 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बायकोसोबत फिरायला गेलेल्या एका इंजिनिअरचा साकीनाका पोलिस स्टेशनमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनीच त्याचा बर्थडे साजरा केला आहे.

अनिश जैन असे या तरूणाचे नाव असून तो मुंबईतील रहीवासी आहे. अनिश जौनचा शनिवारी वाढदिवस होता. तो बायकोसोबत फिरायला निघाला होता. दोघांनी घाटकोपरमध्ये सिनेमाला जाण्याचा प्लॅन केला होता, दुपारी साडेचारच्या सुमारास अनिशने कार साकीनाक्याजवळ सिग्नाला थांबवली असता एका टेम्पोने त्यांना मागून धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र त्याच्या कारचे मोठे नुकसान झाले. वाहन विम्यासाठी दावा करायचा असल्यास कागपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे अनिशला माहित होते. त्यामुळे अनिश जवळच्या पोलिस स्थानकात तक्रार करण्यासाठी दाखल झाला. पोलिसांनी टेम्पो आणि कारची पाहणी केली आणि घटनेची माहिती जाणून घेतली. ही लेखी प्रक्रिया असल्यामुळे अनिषचे किमान दोन तास गेले. बोलता-बोलता, माझा वाढदिवस पोलिस स्टेशनमध्ये घालवेन, असे कधी वाटले नव्हते, असे अनिश म्हणाला. हे पोलिसांनी ऐकले आणि लगेच त्यांनी मिठाई मागवली आणि वाटली. कारच्या अपघातामुळे मनावरील तणाव निवळल्याचे अनिशने सांगितले. मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून हा फोटो शेअरही केला आहे.

 

Related posts: