ताजमहल भारतीय संस्कृतीवरील डाग : आमदार सोम

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ताजमहल हा भारतीय संस्कृतीवरील एक डाग आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार संगीत सोम यांनी केले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरुन नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
सोम म्हणाले, आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत, ताजमहलचा निर्माता शाहजहाँने स्वत:च्या वडिलांना कैद केले होते. त्याला हिंदू धर्म संपवायचा होता. जर ते आपल्या इतिहासातील भाग असतील. तर ही आपल्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. ताजमहाल हा भारतीय संस्कृतीतील डाग आहे. आम्ही हा इतिहासच बदलून टाकू, असे सोम म्हणाले. दरम्यान, सोम यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.