|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » सौराष्ट्रचा दणदणीत एकतर्फी विजय

सौराष्ट्रचा दणदणीत एकतर्फी विजय 

वृत्तसंस्था/ राजकोट

रविंद्र जडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सोमवारी येथे सौराष्ट्रने रणजी स्पर्धेतील ब गटातील सामन्यात जम्मू-काश्मीरचा तिसऱया दिवशीच एक डाव आणि 212 धावांनी दणदणीत पराभव केला.

या सामन्यात जडेजाने अष्टपैलू कामगिरी करताना फलंदाजीत द्विशतक तसेच गोलंदाजीत 7 गडी बाद केले. सोमवारी खेळाच्या तिसऱया दिवशी एकूण 16 गडी बाद झाले. जडेजाने सौराष्ट्रच्या पहिल्या डावात 212 धावा झळकविल्या. त्यानंतर त्याने जम्मू-काश्मीरच्या पहिल्या डावात 4 गडी तर दुसऱया डावात तीन गडी बाद केले. जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 156 तर दुसरा डाव 256 धावावर आटोपला. जडेजाला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. सौराष्ट्रने आपला पहिला डाव 7 बाद 624 धावांवर घोषित केला होता.