|Monday, January 21, 2019
You are here: Home » क्रिडा » एव्हर्टनचा फुटबॉल सामना बरोबरीत

एव्हर्टनचा फुटबॉल सामना बरोबरीत 

वृत्तसंस्था/ लंडन

रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या इंग्लीश प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात वेन रूनीच्या शेवटच्या मिनिटाला नोंदविलेल्या गोलामुळे एव्हर्टनने ब्रिग्टनबरोबरचा सामना 1-1 असा बरोबरीत राखला.

या सामन्यात मध्यंतरापर्यंत उभय संघाकडून गोल नोंदविला गेला नाही. 82 व्या मिनिटाला अँथोनी नॉकेर्टने ब्रिग्टनचे खाते उघडले. 90 व्या मिनिटाला पेनल्टीवर अनुभवी वेन रूनीने गोल नोंदवून एव्हर्टनला या सामन्यात बरोबरी साधून दिली. या स्पर्धेत आता एव्हर्टन आणि ब्रिग्टन यांनी समान 8 गुण मिळविले असले तरी सरस गोल सरासरीच्या आधारे ब्रिग्टन 14 व्या तर एव्हर्टन 16 व्या स्थानावर आहे.

Related posts: