|Tuesday, March 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंजाबमध्ये संघ कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या

पंजाबमध्ये संघ कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या 

लुधियाना

 पंजाबच्या लुधियानामध्ये मंगळवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी संघ कार्यकर्त्यावर त्याच्या घराबाहेरच्या गोळ्या झाडल्या. हत्येनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हींचे चित्रण तपासले असता हल्लेखोर बाईकने पलायन करत असतानाचे दृश्य दिसून आले. हल्लेखोरांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकले. रविंदर गोसाई संघाच्या शाखेतून परतत असताना बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना घेरले आणि गोळ्या घालून पलायन केले. गोसाई यांच्या मृत्यूचे वृत्त मिळताच शेकडो संघ कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले. पोलीस आयुक्त आर.एन. ढोके यांनी घटनास्थळाला भेट देत चौकशीची माहिती घेतली. जमिनीच्या वादावरून रविंदर यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला. 2016 मध्ये संघाचे प्रांत सह संघचालक ब्रिगेडियर जगदीश गगनेजा यांची देखील गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Related posts: