|Wednesday, August 15, 2018
You are here: Home » Top News » अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा आत्मघाती हल्ल्यात 43 सैनिक ठार

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा आत्मघाती हल्ल्यात 43 सैनिक ठार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

अफगाणिस्तानमधील कंधार प्रांतात सैनिकांच्या शिबिरावर तालिबानने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान 43 जण ठार झाल्याचे वृत्त आहे, या हल्ल्यात 9 सैनिक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

या हल्ल्यातील मृतांची संख्या आणखी वढण्याची शक्यता आहे. अफगाणच्या सुरक्षा अधिकाऱयांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दहशतवादी संघटना तालिबानने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ‘टोलो न्यूज’ने दिलेल्या वृत्तनुसार दहशतवादी बुधवारी रात्री स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन सैनिकांच्या शिबिरात घुसले होते.

 

Related posts: