|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » उद्योग » टाटा टेलिसर्व्हिसेस उभारणार 20 हजार कोटीचा निधी

टाटा टेलिसर्व्हिसेस उभारणार 20 हजार कोटीचा निधी 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

प्रेफरन्स समभाग अथवा कर्जरोख्याद्वारे 20,000 कोटी रुपयांच्या निधीउभारणी प्रस्तावास टाटा टेलिसर्व्हिसेच्या (महाराष्ट्र) संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. कंपनीने या निधी उभारणीचे कारण अद्याप स्पष्ट केले नसले तरीही कर्जपरतफेडीसाठी या निधीचा वापर होण्याची शक्यता आहे. यापूर्वी डेट फ्री, कॅश फ्री आधारावर आपला मोबाईल व्यवसाय भारती एअरटेलला विकणार असल्याचे टाटा ग्रूपकडून सांगण्यात आले होते.

टाटा टेलिसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड अर्थात टीटीएमएल ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. कंपनीने निधी उभारणीबाबतच्या योजनेची माहिती बॉम्बे स्टॉक एकस्चेंजला दिली. या वृत्ताने कंपनीचे समभाग वधारले.  विश्लेषकांनुसार टाटा समूह आपल्या मोबाईल व्यवसायाची एयरटेलला विक्री करण्यापूर्वी त्यावरील सर्व कर्ज फेडू इच्छिण्याची शक्यता आहे. कारण त्यामुळे विक्री प्रस्तावाला कर्जदात्यांची मंजुरी मिळवण्यात अडचण येणार नाही. कर्जाच्या बोज्याखाली दबलेल्या रिलायन्स कम्यूनिकेशन्सचे एयरसेलमध्ये विलिनीकरण करण्यास कर्जदात्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे आरकॉम-एयरसेल व्यवहार रद्द करणे भाग पडले होते. याची दखल घेत टाटा टेलिसर्व्हिसेसने हे पाऊल उचलल्याचे तज्ञांचे मत आहे.

 

 

 

 

 

Related posts: