|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » सांगलीत ट्रक अपघातात 10 मजुरांचा मृत्यू

सांगलीत ट्रक अपघातात 10 मजुरांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगलीतील तासगाव – कवठेमहांकाळ मार्गावर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात 10 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. अपघातात 16 जण जखमी झाले असून एसटी बंद असल्याने मजूर ट्रकमधून कराडला जात होते त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

कर्नाटकमधील काही मजूर कराडकडे मजुरीसाठी जात होते. शुक्रवारी कर्मचाऱयांच्या संपामुळे एसटी सेवा बंद असल्याने मजुरांनी एका ट्रकचालकाला कराडपर्यंत सोडण्याची विनंती केली. ट्रक फरशीने भरलेला असल्याने सुरूवातीला ट्रक चालकाने नकार दिला. मात्र मजुरांकी विनंती केल्याने त्याने कराडपर्यंत सोडण्याची तयारी दर्शवली असे सांगण्यात येत आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडी गावाजवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. यात फरशीखाली सापडून 10 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या 11 जणांवर मिरजेतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पाच जणांवर तासगांवमधीय रूग्णालयात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे.