|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टय़ाक

ठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांविरोधात खळ खट्टय़ाक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रेल्वे स्टेशनच्या आवारातील फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईसाठी दिलेले अल्टिमेटम संपल्यानंतर शनिवारी सकाळ मनसैनिकांनी ठाण्यात पेरीवाल्यांना हटवले. पेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड करत मनसैनिकांनी फेरीवाल्यांना हाकलून दिले.

गेल्या महिन्यात एल्फिन्स्टन रोड पुलावर चेंगराचेंगरीत 23 लोक मरण पावल्यानंतर सर्वत्र रेल्वे प्रशासनाविरोधात आणि केंदातील भाजप सरकारविरोधात तीव्र संताप निर्माण झाला होता. राज ठाकरे यांनी 5 ऑक्टोबर रोजी मेट्रो ते चर्चगेट असा ‘संताप मोर्चा’चे आयोजन केले होते. या मोर्चात राज ठाकरेंनी रेल्वे प्रशासनाला इशारा दिला होता.