|Saturday, October 20, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

22 ते 28 ऑक्टोबर 2017

मेष

धनुराशीत शनि ग्रह 26 ऑक्टो. रोजी प्रवेश करीत आहे. गुरु व शनिचे पाठबळ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या क्षेत्रात तुम्ही जास्त मेहनत घ्या. कष्ट करा. यश मिळवा. राजकीय, सामाजिक कार्यात योजना बनवा. नवे कार्य करा. रविवार, सोमवार, संसारात तणाव होऊ शकतो. धंद्यात सुधारणा करा. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात  मागे राहू नका. संधीचा फायदा घ्या.


वृषभ

कठीण प्रसंगावर मात करण्याची जिद्द तुमच्याकडे ठेवा. ग्रह आपल्याला जगात कसे  वागायचे याचे ज्ञान देत असतात. आणि प्रेम, अतिविश्वास व अति लुबाडणे माणसाला त्रासदायक ठरूच शकते. धनु राशीत शनि प्रवेश व शुक्र नेपच्युन षडाष्टक योग होत आहे. कोणताही व्यवहार करताना सावध रहा. संसारात वाद वाढवल्यास कोर्टापर्यंत प्रकरण जाऊ शकते. राजकीय- सामाजिक कार्यात तत्परता व प्रामाणिकता ठेवल्यासच टिकाव लागेल. कोर्टकेसमध्ये फसगत होईल. नोकरीत, कामात चुका होऊ शकतात. वस्तू सांभाळा.


मिथुन

मिथुन राशीच्या सप्तमस्थानात शनि प्रवेश करीत आहे. सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. या सप्ताहात अडचणीवर जिद्दीने यश मिळवायचे आहे. राजकीय, सामाजिक कार्यात व्याप वाढेल. कठोर बोलणे टाळा. धंद्यात मजूर वर्गाची कमी राहिल. तुम्हाला स्वत:ला लक्ष द्यावे लागेल. मुलांसंबंधी चांगली बातमी मिळेल. वरि÷ नोकरीत तुमचे कौतुक करतील. नव्या नोकरीसाठी प्रयत्न करता येईल. वाद न वाढवता प्रेमाने समस्या सोडवा. तुमचे महत्त्व वाढेल.


कर्क

कर्केच्या ष÷स्थानात शनि 26 ऑक्टो. रोजी प्रवेश करीत आहे. रवी- गुरु युती होत आहे. बुधवार, गुरुवार वादाचे प्रसंग निर्माण होतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात मेहनत घ्यावी लागेल. तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो.नोकरीत कामाची गर्दी होईल. प्रेमात किरकोळ वादळ येईल. विद्यार्थी वर्गाने सातत्याने अभ्यास करावा. शेतकरी वर्गाला प्रसंगानुरुप निर्णय बदलावा लागू शकतो.


सिंह

तुमच्या योजना मार्गी लावण्यासाठी या सप्ताहात जास्त मेहनत घ्यावी लागेल. अडचणी आल्या तरी मार्ग मिळेल. सहकार्य मिळेल. तुमचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न होईल. टिका होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची प्रति÷ा व लोकप्रियता वाढेल. नवे डावपेच टाकता येतील. गुप्त शत्रूला कमी समजून चालणार नाही. नोकरी धंद्यात तडजोड करावी लागेल. सहकारी, नेते मदत करतील. संसारात जीवन साथीची साथ मिळेल.


कन्या

कन्या राशीच्या चतुर्थस्थानात शनि प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुम्ही ठरवता त्यापेक्षा अधिक वेगळय़ाच प्रकारचे  काम तुम्हाला करावयास मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा व प्रेम मिळेल. मनाप्रमाणेच सर्व घडेल असे मात्र समजू नका. धंद्यात वाढ करा. आळस न करता स्वत:चे भवितव्य घडवा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. घर, वाहन, जमिन खरेदीची संधी मिळेल. संसारात शुभ समाचार मिळेल. विद्यार्थी वर्गाने ध्येय सोडू नये. कलेत प्रगती होईल.


तुळ

धनु राशीत शनि प्रवेश करीत आहे. 26 ऑक्टो. रोजी 15.28 ला तुला राशीची साडेसाती पूर्णपणे संपणार आहे. आतापर्यंत आलेले चांगले, वाईट अनुभव ही तुमच्या जवळची ठेव आहे. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करा. नोकरी-धंद्यात प्रगित होईल. विस्कळीत झालेला संसार सुरू होईल. हळूहळू प्रगतीची दिशा तुम्हाला मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू नका. शेतकऱयाला चांगले दिवस येतील.


वृश्चिक

साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होत आहे. धनु राशीत शनि प्रवेश करीत आहे. कोणत्याही निर्णयात अतिशयोक्ती अरेरावी करू नका. तुमचे मनोधैर्य टिकून राहिल. फाजिल आत्मविश्वास ठेऊ नका. राजकीय सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. तत्परता ठेवा. धंद्यात संधी मिळेल. प्रेमात वाद होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. भलत्या व्यक्तींवर एकदम विश्वास ठेऊ नका. सशक्त व्हा.


धनु

तुमच्या राशीत शनि प्रवेश करीत आहे. साडेसातीचे पहिले पर्व संपले आहे. शनि हा माणसाचा खरा गुरु ठरतो. विविध अनुभव देतो कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती माणसाला करू देत नाही. चौफेर सावध राहावयास शिकवतो. सुर्य,चंद्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला कटकटी होतील. बुधवारपासून तुमचे काम व्यवस्थित होईल. सहकार्य मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. नोकरीची संधी मिळेल. धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. शेतकरी थोडातरी सुखावेल.


मकर

26 ऑक्टोबर रोजी मकर राशीला साडेसाती सुरू होत आहे. धनुराशीत शनि प्रवेश व सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. घाबरुन न जाता तुमच्या कार्यातील, स्वभावातील त्रुटी शोधून काढा. सुधारणा करा. दुसऱयाला दोष देण्यापेक्षा स्वत:त सुधारणा करा. प्रगतीची संधी मिळेल. बुधवार, गुरुवार, मनावर दडपण येईल. राजकीय, सामाजिक कार्यात नव्या पद्धतीचा वापर करा. कारणे शोधा व प्रगतीची वाट तयार करा. नोकरी धंद्यात सुधारणा करता येईल. विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी.


कुंभ

कुंभेच्या एकादश स्थानात शनि प्रवेश व सूर्य चंद्र लाभयोग होत आहे. तुमच्या प्रगतीला कुणीही रोखू शकणार नाही. कामे करा. यश मिळवा. धंद्यातील थकबाकी वसूल करा. राजकीय, सामाजिक कार्यात जोरदार मेहनत घ्या. पुढील काळासाठी योजना बनवा. धंदा वाढवा. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. संसारात सुखाचे क्षण येतील. शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल. नवे तंत्र वापरता येईल. शुक्रवार, शनिवार शेजारी त्रस्त करेल. रागावर ताबा ठेवा.


मीन

मीन राशीच्या दशमस्थानात शनि प्रवेश करीत आहे. तुमचे कार्यात शनिचे सहाय्य मिळेल. या सप्ताहात मनाचे सामर्थ्य टिकून राहिल. राजकीय, सामाजिक कार्यात टिकाव धरावा लागेल. आरोप सहन करावा लागेल. जवळच्या नेते, सहकारी  यांना दुखवू नका. संसारात खर्च वाढेल. प्रेमात तणाव संभवतो. महत्त्वाची वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा. कोर्टाच्या कामात पैसे देऊन काम करता येईल. असे समजू नका. फसगत होईल. विद्यार्थी वर्गाने आळस करू नये. खाण्याची काळजी घ्यावी.

Related posts: