|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » इजिप्तमध्ये चकमकीत 55 पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू

इजिप्तमध्ये चकमकीत 55 पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू 

कैरो

: दहशतवादी तळावर छापा टाकण्याची कारवाई करताना झालेल्या गोळीबारात इजिप्तमध्ये कमीतकमी 55 पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 अधिकारी आणि 32 जवानांचा समावेश आहे. वृत्तसंस्थेने इजिप्तच्या सुरक्षा अधिकाऱयांच्या हवाल्याने ही माहिती दिली. चकमक शुक्रवारी रात्री उशिरा कैरोपासून 135 किलोमीटर अंतरावरील गीजा प्रांताच्या अल-वहात अल-बहरिया भागात झाली. सुरक्षा कर्मचारी येथे छापा टाकण्यासाठी पोहोचले असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. अधिकाऱयांनुसार मृतांची संख्या वाढू शकते. अधिकाऱयांनी स्वतःचे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर याविषयीची माहिती दिली. इजिप्तच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक वक्तव्य प्रसिद्ध केले, परंतु मृतांची संख्या सांगणे टाळले. इजिप्तमध्ये मुस्लीम ब्रदरहूड या संघटनेचा सरकारशी संघर्ष सुरू आहे. तसेच तेथे इस्लामिक स्टेटने देखील शिरकाव केला आहे. परंतु हा हल्ला नेमका कोणी केला हे अजून समोर आलेले नाही.