|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 4 वर्षांमध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर 155 कोटींचा खर्च

4 वर्षांमध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षेवर 155 कोटींचा खर्च 

नवी दिल्ली

 राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दलांच्या वेतनावर मागील 4 वर्षांमध्ये 155.4 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाच्या पोलीस उपायुक्तांनी दिली. लखनौमधील आरटीआय कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी या खर्चाशी माहिती मागविली होती. आर्थिक वर्ष 2014-15 मध्ये राष्ट्रपतींच्या सुरक्षा दलांच्या वेतनावर 38.17 कोटी रुपये खर्च झाले. याचप्रकारे 2015-16 मध्ये 41.77 कोटी रुपये, 2016-17 मध्ये 48.35 कोटी रुपये आणि 2017 मध्ये 27.11 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाने आरटीआयच्या उत्तरादाखल दिली. याव्यतिरिक्त 4 वर्षांमध्ये सुरक्षा दलांना पुरविण्यात आलेलया वाहनांची देखभाल आणि दुरुस्तीवर 64.9 लाख रुपयांचा खर्च झाला. यात 2014-15 मध्ये 15.5 लाख, 2015-16 मध्ये 20 लाख, 2016-17 मध्ये 21.8 लाख आणि चालू वर्षात 7.5 लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. तसेच या खर्चात वाहनांसाठी वापरण्यात आलेल्या इंधनाचा खर्च समाविष्ट नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी किती जण तैनात आहेत याची माहिती देण्यास नकार दिला.