|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बँक खाते-आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक

बँक खाते-आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक 

मुंबई / वृत्तसंस्था

मनी लॉन्डरिंगविरोधी कायद्यानुसार बँक खात्याला आधार क्रमांक जोडणे अनिवार्य असल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे. केंद्रीय बँकेने आरटीआयला उत्तर देताना, बँक खात्याला आधार क्रमांकाबरोबर लिंक करणे गरजेचे नसल्याची अफवा पसरविण्यात आली होती. यानंतर स्पष्टीकरण देताना आरबीआयकडून बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक करणे बंधनकारक आहे. यासाठी 1 जून 2017 रोजी अधिकृतपणे निवेदन जारी करण्यात आले. काही समाज माध्यमांवर गैरसमज पसरविण्यात येत आहेत. मनी लॉन्डरिंगविरोधी कायदा 2017 मध्ये बदल करण्यात आल्याने दोन्ही क्रमांक लिंक करणे सक्तीचे असल्याचे आरबीआयने ट्विटरवर म्हटले. 31 डिसेंबरपर्यंत सर्व सरकारी बँकांतील खात्यांबरोबर आधार जोडण्यात यावा असे सरकारने अगोदरच सांगितले आहे.