|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » क्रिडा » बुकीची ऑफर सर्फराज अहमदने धुडकावली

बुकीची ऑफर सर्फराज अहमदने धुडकावली 

वृत्तसंस्था/ कराची

सध्या सुरू असलेल्या पाक आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेवेळी बुकीचा खेळाडूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाल्याच्या बातमीने पुन्हा पाक क्रिकेट क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. लंका आणि पाक यांच्यातील वनडे मालिकेतील दुबई येथील सामन्यात एका बुकीने पाकचा कर्णधार सर्फराज अहमदला मोठी ऑफर दिल्याचे समजते. पण सर्फराज अहमदने ही ऑफर धुडकावल्याचे सांगण्यात आले. या प्रकरण आता भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा पथकाकडे सोपविण्यात आले आहे.

या प्रकरणामुळे पाक संघ व्यवस्थापनाला मोठा धक्का बसला आहे. पाक संघाबरोबर भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा पथकाचे अधिकारी संयुक्त अरब अमिरातला प्रयाण केले. पाकमधील सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत शार्जिल खान आणि खलिद लतिफ यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला असून त्यांच्यावर पीसीबीने बंदी घेतली आहे. सर्फराज अहमदच्या प्रकरणाची खोलवर चौकशी करण्याचा आदेश पीसीबीने दिला आहे. दरम्यान दुबईतील पाक संघाच्या नियोजित हॉटेलमध्ये पीसीबीच्या आदेशानुसार बदल करण्यात आला आहे.

Related posts: