|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाडव्या दिवशी सराफ बाजारात 3 कोटींची उलाढाल

पाडव्या दिवशी सराफ बाजारात 3 कोटींची उलाढाल 

प्रतिनिधी/ सोलापूर

साडेतीन मुर्हूतापैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱया दिवाळीच्या पाडव्या दिवशी सोलापूरकर सोने खरेदी करीत असतात. पाडव्या निमित्त सोलापूरातील सराफा बाजारात शुक्रवारी सोनं खरेदी करण्यासाठी सोलापूरकरांनी विशेषतः महिलांनी मोठी गर्दी केलेली होती. पाडव्या दिवशी सोनं खरेदीमध्ये जीएसटीचा परिणाम दिसून आलेला नाही मात्र सोन्यावर 3 टक्के जीएसटी जास्त होत असल्याची खंत ग्राहकांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षापेक्षा यंदाच्या सोने खरेदी-विक्रीत वाढ झाली असल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमनी यांनी सांगितले.

  विजयादशमी नंतर चांगला मुर्हूत असणारा दिवस म्हणजे पाडवा. यादिनी नागरिक सोन्याची खरेदी करून गुंतवणूक करीत असतात. पाडव्यामुळे शहरातील सराफा बाजाराती आपटे ज्वेलर्स, चडचणकर ज्वेलर्स, शिंगवी ज्वेलर्स, काका ज्वेलर्स, कुलदैवत ज्वेलर्स अशी विविध दुकाने सजलेली होती. यादिनी गळ्यातील मंगळसूत्र, चैन, नेकलेस, कानातील कर्णफुले, गंठण, हातातील बांगडय़ा, नाकातील नथ, चांदीचे पैंजण, असे विविध सोन्याची आणि चांदीची खरेदी सोलापूरकरांनी केलेली आहे.

  सोलापूरातील सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी सोलापूर जिह्यासह आंधप्रदेश, कर्नाटक, गुलबर्गा, उस्मानाबाद, लातूर येथील नागरिक येत असतात. यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त सोन्याची खरेदी-विक्री मोठय़ाप्रमाणात झालेली आहे. पाडव्यादिवशी सोन्याचा भाव 29 हजार 370 इतका होता. सोनं खरेदी करण्यासाठी तरूण-तरूणीसह विशेषतः महिलांची प्रचंड गर्दी केलेली होती.

Related posts: