|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिल्हा बँकेत ठेव पंधरावडा

जिल्हा बँकेत ठेव पंधरावडा 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिह्याची अर्थवाहिनी असून ग्रामीण तसेच शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. नाबार्डकडून सलग सहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार प्राप्त करुन सभासद, शेतकरी, सर्व सामान्य असंख्य हितचिंतक या सर्वाच्या विश्वासात पात्र ठरलेल्या व आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीदारांना व्याजरुपाने उत्तम व्याज परतावा मिळावा याकरता दिपावलीचे औचित्य साधून 31 पर्यंत बँकेच्या सर्व शाखांमधून ठेव वाढ पंधरावडा ही योजना सुरु केली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेने 181 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 7.25 टक्के, 1 वर्ष ते 3 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी 8.00 टक्के, 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी मुदतीसाठी 8.25 टक्के, 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंत 8.50 टक्के दराने मुदत ठेवीवरील व्याजदर लागू आहेत. तसेच दाम दीडपट ठेवीचा कालावधी 59 महिने 18 दिवस व दामदुप्पट ठेवीचा कालावधी 98 महिने 28 दिवस असून ज्येष्ठ नागरिकांचे मुदत ठेवीवर प्रचलित व्याजदरापेक्षा 1 टक्का ज्यादा व्याजदराचा लाभ देण्यात आला आहे. जिह्यातील बँकेच्या 272 शाखांमधून व 45 विस्तारीत कक्षाद्वारे ग्राहकांची सेवा बँक करत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक सेवा देण्यास तत्पर सदैव तयार आहे. आमच्या बँकेच्या सर्व ठेवीवरील व्याजदर अत्यंत आकर्षक आहेत. जिह्यातील सर्वांगिण विकासासाठी बँकेने अनेकविध योजना आखल्या असून त्यास जिह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कृषी व कृषी औद्योगिक उत्पादनात भरघोस वाढ करण्यासाठी आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. तेव्हा आजच बँकेच्या नजिकच्या शाखेमध्ये विविध ठेव योजनेत गुंतवणूक करुन सहकार्य करा, आपल्या ठेवीबाबत निश्चित रहा, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले आहे.