|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा

रिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा 

प्रतिनिधी / राजापूर

राजापूर तालुक्यातील नाणार गाव व परिसरात होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्या रविवारी दामोदर हॉल परेल, मुंबई येथे सकाळी 10 वाजता कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या वतीने रिफायनरी विरोधी दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

राजापूर तालुक्यातील नाणार पंचक्रोशीमध्ये रिफायनरी हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प होऊ घातला आहे. या प्रकल्पाला स्थानिक जनतेतून मोठय़ा प्रमाणात विरोध केला जात आहे. मात्र शासन हा प्रकल्प होण्यासाठी हर तऱहेचे प्रयत्न करत आहे. सध्या या प्रकल्पाला विरोध होत असताना प्रकल्पाची जनसुनावणी करून घेण्याचे सोपस्कार शासन स्तरावर सुरू आहेत. मात्र जनसुनावणी दरम्यानही हा प्रकल्पच आम्हाला नको असल्याचे प्रकल्पग्रस्त तसेच प्रकल्प बाधित जनता टाहो फोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

या पार्श्वभूमीवर रिफायनरी विरोधी लढा तिव्र करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या वतीने उद्या रविवारी सकाळी 10 वाजता मुंबई परेल येथील दामोदर हॉल येथे रिफायनरी विरोधी दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली असून या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने प्रकल्प बाधित उपस्थित राहतील अशी अपेक्षा आयोजकांना आहे. दरम्यान या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

 

 

Related posts: