|Sunday, February 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सोमनाथ कोमरपंत यांच्या पुस्तकांच प्रकाशन

सोमनाथ कोमरपंत यांच्या पुस्तकांच प्रकाशन 

प्रतिनिधी/ पणजी

  कविकुलगुरु केशवसूत व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज कविंनी आपल्या साहित्यात विद्याशाखेच्या अनेक गोष्टी वाचकापर्यंत पोहचविल्या आहेत त्यामुळे हे कवी जनमानसात शेष्ठ ठरले आहेत. अशा या थोर कविंच्या साहित्यावर समिक्षा करणे सोपे नसून सोमनाथ कोमरपंथांनी हे करुन दाखविले आहे त्यांच्या साहित्यावर कठोर अभ्यास करुन त्यांनी ‘कविकुलगुरु केशवसुत’ यां पुस्तकाची दुसरी आवृती व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे पुस्तक लिहीले आहे, असे यावेळी प्रसिद्ध साहित्यिक डॉ. प्रमोद पाठक यांनी सांगितले. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या सोमनाथ कोमारपंथ यांच्या ‘कविकुलगुरु केशवसूत’ व  ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.

 सोमनाथ कोमरपंथानी या दोन्ही लेखकांच्या कवितांचा मुळापासून अभ्यास केला आहे. हे थोर कविवर लिहीणे तेवढे सोपे नाही. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक  समस्यांना वाचा फोडली होती. अनेक विषयावर त्यांनी लेखन केले होते. त्यामुळे आज  ते अजरामर झाले आहेत, असेही यावेळी डॉ. प्रमोद पाठक यांनी सांगितले.

वाचक लेखक यांना जवळ आणण्याचे काम केले

 वाचक लेखक यांचे नाते दुरावत चालले आहे. वाचकांना पुन्हा लेखकांकडे आणण्याचे काम सोमनाथ कोमरपंथ यांच्या ‘कविकुलगुरु केशवसुक्त व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज’ या दोन पुस्तकामुळे झाले आहे. त्यांच्या या पुस्तकामध्ये या दोन्ही महान कविचे वर्णन अगदी सखोल करण्यात आले आहे.  सोमनाथ कोमरपंथ हे मराठी कवितांचे माहेर घर आहे. त्यांच्या दोन्ही पुस्तकामध्ये या कविंच्या सर्व कवितांचे समिक्षण केले आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे समिक्षण करुन लोकांना कळेल अशा साध्या सोप्या भाषेत हे पुस्तक लिहीले आहे. कवी कुसुमाग्रज हे थोर कवी होते. त्यांच्या कवितामध्ये अनेक सामाजिक विषय हाताळले जायचे. अनेक  विषय त्यांनी घेतेले आहे. कुसुमाग्रज यांच्या कविता अगदी मनाला भिडणाऱया आहेत. सोमनाथ कोमरपंथांनी योग्य प्रकारे या कवितांचा अभ्यास करुन एक चांगले लेखन या पुस्कामध्ये केले आहे. या दोन्ही पुस्तकांचा आस्वाद वाचकांनी घ्यावा, असे यावेळी डॉ. सचिन कांदोळकर यांनी सांगितले.

सोमनाथ कोमरपंथ गुरुजीच्या पुस्तकावर बोलण्याची संधी मिळाली हे भाग्य आहे. कविकुलगुरु कशेवसुत हा क्रातींकारी कवी होता. त्यांची आठ विविध प्राकरणे या पुस्तकातून कोमरपंथानी मांडली आहे. या पुस्तकाची विभागणी चांगली आहे. केशवसुत यांच्या मालगुणी येथील घर तसेच केशवसुतांचा कालखंड असे अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये समाविष्ठ आहे. केशवसुत यांच्या जीवनावर सर्व गोष्टीचा उलघडा कोमरपंथांनी या पुस्तकात केला आहे. त्यांनी आपल्या कवितामध्ये अनेक विषय हाताळले आहे. आपण क्रातींकारक होतो हे त्यांना आपल्या कवितातून दाखविले आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचल्यावर अनेक गोष्टीचा आपल्याला उलघडा होणार आहे, असे यावेळी कवियित्री पौर्णिमा केरकर यांनी सांगितले.

यावेळी पुस्तकाचे लेखक सोमनाथ कोमरपंथानी आपल्या दोन पुस्तका विषयी rमाहिती दिली. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष संजय हरमलकर यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले. तसेच गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. यावेळी या पुस्तक प्रकाशन सोहळय़ाला मोठय़ा प्रमाणात लोक उपस्थित होते.

Related posts: