|Saturday, April 20, 2019
You are here: Home » leadingnews » अधार कार्ड – बँक खात्याशी लिंक करण्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका

अधार कार्ड – बँक खात्याशी लिंक करण्याविरोधात सुप्रिम कोर्टात याचिका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आधार क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडणे अनिवार्य असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले असतानाच याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आधार – बँक खाते जोडल्याने व्यक्तीगत गोपनीयता या अधिकाराचे उल्लंघन होते, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

समाजिक कार्यकर्त्या कल्याणी मेनन सिंह यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’या वृत्तपत्राने दिले आहे. केंद्र सरकारने मार्च महिन्यात आधार क्रमांक – मोबाईल नंबरशी जोडणे बंधनकारक केले होते. तर जूनमध्ये ‘आधार’ बँक खात्याशी जोडण्याचा निर्णय घेतला होता. या दोन्ही निर्णयांना सिंह यांनी अव्हान दिले आहे. या दोन्ही निर्णयांमध्ये व्यक्तीगत गोपनियतेचे उल्लंघन होते आणि त्यामुळे हा निर्णय असंवैधानिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या निर्णयांमुळे नियमांचे उल्लघंन होते, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. बँक खाते आणि आधार लिंक केल्यास अर्थिक धोकाही निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 

Related posts: