|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / मनमाड :

मनमाडच्या तळेगाव भामेर गावात नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात अडीच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. कोमल नामदेव रामदास असे या मुलीचे नाव आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ही मुलगी आपल्या आई-वडीलांसोबत झोपली होती. याचवेळी बिबटय़ाने हल्ला केला. कोमलच्या रडण्याच्या आवाजाने आई वडील जागे झाले. मात्र तोपर्यंत बिबटय़ाने कोमलला उचलून नेले होते. सकाळी शेजारील उसाच्या शेतात कोमलचे शीर सापडले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात नरभक्षक बिबटय़ाचा वावर होता. वन विभागाच्या दुर्लक्षमुळे एका चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

 

Related posts: