|Saturday, January 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आगळय़ा पतंजलीचे वेगळे व्यवस्थापन

आगळय़ा पतंजलीचे वेगळे व्यवस्थापन 

पतंजली आणि बाबा रामदेव हे गेल्या दशकात राष्ट्रीय स्तरावर अनेकार्थांनी चर्चेत राहिलेले पर्यायवाची शब्द ठरले आहेत. गेल्या काही वर्षात ‘पतंजली आयुर्वेद’ ने केलेली आर्थिक-व्यवसायिक प्रगती तर अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावर व बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील पट्टीच्या व्यवस्थापन तज्ञाना पण पतंजलीचे कोडे पुरतेपणी उलगडलेले नाही, हा इतिहास ताजा आहे.  अगदी ताज्या आकडेवारीसह सांगायचे झाल्यास मे 2017 मध्ये पतंजली आयुर्वेदने 2016-17 या वषी कंपनीची वार्षिक उलाढाल दुपटीने वाढून 10 हजार कोटींवर पोहोचल्याचे अधिकृतपणे जाहीर केल्यावर तर पतंजली, कंपनीचे उत्पादन आणि त्याचे व्यवस्थापन या संस्थांच्या संदर्भातील उत्सुकता सर्वदूर शीगेला पाहोचली. तुलनात्मक संदर्भात सांगायचे झाल्यास 2015-16 या आर्थिक वर्षात सुमारे 5,000 कोटीची उलाढाल करणाऱया पतंजलीने 2016-17 या आर्थिक वर्षात आपला व्यवसाय तब्बल 10,561 कोटींवर नेऊन ठेवला. कंपनीच्या वाढीव उलाढालीत पतंजली अंतर्गत अग्रणी असणाऱया पतंजली आयुर्वेदची उलाढाल 9,634 कोटी होती. तर अन्य उत्पादनांमध्ये दिव्य फार्मसी 870 कोटी, पतंजली गायीचे तूप 1476 कोटी, दंतकांती 940 कोटी, केशकांती 825 कोटी, पतंजली हर्बल साबण 574 कोटी, मध 350 कोटी, व सरसूचे तेल 522 कोटी अशाप्रकारे विक्रमी व्यवसाय साध्य केला. गेल्या वषीच्या वाढीव व्यवसाय व विक्रीमुळे पतंजली उद्योग ही आजमितीस भारतातील दुसऱया क्रमांकाची ग्राहकोपयोगी वस्तू व उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी ठरली आहे. देशातील या क्षेत्रातील पहिल्या क्रमांकाची कंपनी असणाऱया हिंदुस्थान युनिलिव्हरचे व्यवसायिक स्थान लक्षात घेता पतंजलीचे यश विशेष उल्लेखनीय ठरते. आपल्या या यशस्वी व्यावसायिक वाटचालीत बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योगाने केवळ एक वर्षाच्या काळात आयटीसी, नेस्ले, गोदरेज, डाबर, टाटा या आधीच्या प्रस्तापित व भल्या-भल्या आंतरराष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसायाच्या संदर्भात माघारी सारले हे विशेष!

योग आणि योगासनांचा प्रचार-प्रसाराद्वारे आपल्या सार्वजनिक जीवनाची व्यापकता वाढविणाऱया बाबा रामदेव यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी जेव्हा आयुर्वेदिक उत्पादनक्षेत्रात पदार्पण केले होते तेव्हा बाबा रामदेव यांच्या या उपक्रमाला ‘एका साधुबाबाचा जडीबुटी प्रयोग’ असेच सर्वसाधारणपणे समजले जात होते. मात्र गेल्या दशकात सारेच चित्र बदलण्याचा व्यावसायिक विक्रम बाबा रामदेव व त्यांच्या पतंजलीने घडवून आणला हा इतिहास अगदी ताजा आहे. बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजलीमध्ये अगदी आगळी-वेगळी कार्यसंस्कृती साकारून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली हे विशेष. पतंजलीच्या कार्य-संकृतीची सुरुवातीपासूनच जी प्रमुख वैशिष्टय़े होती ती म्हणजे सेवा-समर्पण, ऊर्जा व दर्जा! या कार्यप्रवण कार्यसंस्कृतीचा उल्लेख कुठल्याही व्यवस्थापन संस्था अभ्यासक्रम वा पुस्तक-प्रबंधात मिळणार नसेल ते सारे बाबा रामदेव यांनी प्रत्यक्षात साकारले आहे.

या साऱयासाठी बाबा रामदेव यांनी योगाच्याद्वारे आपल्या प्रभावळीत दाखल झालेले सर्वसामान्य जन आणि युवावर्गाचा प्रामुख्याने समावेश करून घेतला. व्यवसाय-प्रबंधनाची पतंजलीची धुरा बाळकृष्ण या नव्या पिढीतील साधक-व्यवस्थापकाकडे सोपवितानाच बाबा रामदेव यांनी आपली योजक-मार्गदर्शक ही नेमकी भूमिका नेटकेपणे सतत पार पाडली. बाबा रामदेव यांच्या याच भूमिकेची अंमलबजावणी प्रकर्षाने केल्यामुळेच पतंजलीच्या एकूणच व्यवसाय कारभारात सेवा म्हणजे नोकरी, समर्पण म्हणजे संपूर्ण कर्तव्यनि÷पणे काम, उर्जा म्हणजे उत्साही व प्रसन्न मत आणि मानसिकतेसह काम आणि दर्जा म्हणजे संपूर्ण व दर्जात्मक उत्पादन! या चार प्रमुख कामकाज तत्त्वांची अंमलबजावणी बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांच्यापासून पतंजली आयुर्वेद कंपनीतील प्रत्येक कर्मचारी कशी आणि कशाप्रकारे करतात ते मुळापासूनच पडताळून पाहण्यासारखे व व्यवसाय-व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वांसाठी मार्गदर्शकपण आहे.

पतंजलीच्या कंपनीस्तरीय चर्चा-बैठकींचे पण असेच वैशिष्टय़ म्हणावे लागेल. पतंजलीच्या व्यापक बैठकांमध्ये एकमेव व्यक्ती म्हणजेच बाबा रामदेव सर्वांचे गुरु व पतंजलीचे मार्गदर्शक म्हणून उच्चासनावर बसतात, तर कंपनीचे मुख्याधिकारी, सर्व व्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी साधेपणाने व खाली बसतात. कंपनीचे माजी मुख्याधिकारी एस. के. पात्रा यांच्या मते अशा व्यवस्था व पद्धतीमुळे कंपनीतील सर्व स्तरावरील व सर्वच कर्मचाऱयांमध्ये भेदभावरहित व समानतेची भावना निर्माण होते व त्या सर्वांना प्रेरणा मिळते त्यांचे प्रेरणास्थान असणाऱया बाबा रामदेव यांची. स्वतः एस. के. पात्रा हे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलाजी व इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट पात्रताधारक आहेत हे या संदर्भात उल्लेखनीय आहे.

प्रत्येक उत्पादनाच्या निर्मिती आणि विक्री-व्यवहारात संबंधित वस्तू वा उत्पादनाची विक्री किंमत हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. यासंदर्भात बाबारामदेव यांची स्पष्ट अशी भूमिका आहे व ती म्हणजे उत्पादनाची किंमत ठरविताना काळजी घ्या पण त्याचवेळी त्याची खूप काळजी करू नका. या संदर्भात प्रमुख उदाहरण म्हणजे पतंजली द्वारा उत्पादित मिठाची किंमत. यासंदर्भात थोडक्मयात सांगायचे झाल्यास 1 किलो मिठासाठी टाटा कंपनी 20 रु., आशीर्वाद 18 रु. तर सफोला चक्क 21 रु.पण पतंजली मिठाची किंमत केवळ 12 रु. प्रतिकिलो ठेवली होती. यासाठी बाबा रामदेव यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास करून गुजरातच्या मोठय़ा मिठागरांशी थेट बोलणी करून कमीत कमी किमतीत मूळ मीठ थेट मिठागरांमधून खरेदी करून, त्यावर आयोजित प्रक्रिया करून उत्तम दर्जेदार मीठ अत्यंत माफक दरात आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे अशक्मय काम सातत्याने शक्मय करून दाखविले.  युनिलिव्हर मध्ये मुख्याधिकारी म्हणून काम केल्यावर सध्या रिलायन्स रिटेलमध्ये अध्यक्ष म्हणून काय गरणारे गुणेंद्र कपूर पण मोकळेपणे मान्य करतात की पतंजली व रामदेवबाबांचे प्रमुख व्यावसायिक वैशिष्टय़ म्हणजे ते व्यवसायात पैशांच्या कच्छपी लागत नाहीत. त्यांचा भर त्यांच्या स्वतःच्या अशा सैद्धांतिक व्यवहार-व्यवसायावर असतो. त्यांच्या फायद्याचे प्रमाण नगण्य असते, पण ग्राहकांकडून पतंजलीच्या सर्वच उत्पादनांना सातत्याने होणाऱया वाढीव मागणीमुळे हीच बाब आज पतंजलीसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरली आहे हे आज बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही मान्य केली आहे.  आपले व्यावसायिक उद्दिष्ट व्यापक स्वरुपात सांगताना बाबा रामदेव स्पष्टपणे नमूद करतात की, आज पतंजलीचा सर्वत्र बोलबाला आहे, पण तुम्ही अजून माझे खरे कामकाज कर्तृत्त्व बघितलेच नाही. माझ्या प्राधान्यक्रमानुसार मला नजीकच्या भविषात भारतातील सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्यांचा शीर्षासन करावयास लावायचे असून आगामी पाच वर्षात भारताला ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात जगात सर्वच्चपदी बसवायचे आहे. ‘कितना मजा आयेगा?’ या प्रश्नार्थक चिन्हासह ते आपले ध्येय वाक्मय पूर्ण करतात व त्यातच बाब रामदेव आणि त्यांच्या पतंजलीचे सामर्थ्य सामावलेले आहे.

Related posts: