|Saturday, December 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » मुसळधार पाऊस, वादळात जपानमध्ये पार पडले मतदान

मुसळधार पाऊस, वादळात जपानमध्ये पार पडले मतदान 

टोकियो

 जपानमध्ये लॅन चक्रीवादळामुळे वाहणारे वेगवान वारे आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता लाखो लोकांनी रविवारी मतदानात भाग घेतला. मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुकीद्वारे पंतप्रधान शिंजो अबे यांना अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन आणि उत्तर कोरियाच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यासाठी जनमत मिळण्याची शक्यता आहे. जपानमध्ये सकाळी 7 वाजता (स्थानिक प्रमाणवेळेनुसार) मतदानास प्रारंभ होत ते रात्री 8 वाजेपर्यंत चालले. पश्चिम जपानच्या कोची येथे भूस्खलनामुळे मतदान 20 मिनिटे विलंबाने सुरू झाले. वादळाच्या मार्गात येणाऱया दक्षिण बेटावर शनिवारीच मतदान घेण्यात आले. खराब हवामानामुळे मतदान प्रभावित झाले तर याचा लाभ अबे यांना मिळेल असे विश्लेषकांचे मानणे आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचे निष्कर्ष खरे ठरल्यास अबे यांना दोन तृतीयांश बहुमत मिळू शकते. दोन तृतीयांश बहुमत मिळाल्यास अबे घटनेत दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. या दुरुस्तीद्वारे युद्धविषयक निर्बंध आणि सैन्याची स्वसंरक्षणापुरती मर्यादित भूमिका संपुष्टात आणली जाऊ शकते.

Related posts: