|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » कोल्हापूरच्या ठकसेनाकडून स्कार्पिओसह रोख रक्कम जप्त

कोल्हापूरच्या ठकसेनाकडून स्कार्पिओसह रोख रक्कम जप्त 

प्रतिनिधी/ चिपळूण

फक्त 50 हजार रूपये भरा व 20 लाखाचे कर्ज घ्या, अशी बतावणी करून येथील 58 जणांना 16 लाख 15 हजार रूपयांचा गंडा घालणाऱया कोल्हापूर येथील मुख्य ठकसेनाकडून 3 लाख 20 हजार रूपयांची रोख रक्कम व स्कार्पिओ गाडी येथील पोलिसांनी कोल्हापूर येथून जप्त केली आहे.

विजय महादेव ढोपे असे त्याचे नाव आहे. या फसवणुकीप्रकरणी त्याच्यासह श्रीकांत रगमाण्णा शिंगाई व अन्य एकावर गुन्हा दाखल झाला असून विजय व श्रीकांत यांना अटक होऊन ते पोलीस कोठडीत आहेत, तर त्यांचा साथीदार फरारी असून त्याचा शोध सुरू आहे.

तुम्ही फक्त 50 हजार रूपये भरा व 20 लाखाचे कर्ज घ्या, अशी बतावणी करून विजय, श्रीकांत व त्यांच्या एका साथीदाराने येथील डॉ. अरविंद बाळकृष्ण पाटील, अमरदीप तानाजी खताते यांच्या माध्यमातून 58जणांना 16 लाख 15 हजार रूपयांचा गंडा घातला आहे. एवढेच नव्हे तर कर्जापोटी पाठवलेल्या बॅगांमध्ये रद्दी असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. या दरम्यान झालेल्या तपासात विजय याचा फसवणूक हाच धंदा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याला घेऊन येथील पोलीस कोल्हापूर येथे गेले होते. तेथून त्याची स्कार्पिओ गाडी व 3 लाख 20 हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या दोघांची पोलीस कोठडी सोमवारी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या बाबतचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे करीत आहेत.

Related posts: