|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » नरेंद्र पटेलांपाठोपाठ निखिल सवानींचा भाजपला राम राम

नरेंद्र पटेलांपाठोपाठ निखिल सवानींचा भाजपला राम राम 

ऑनलाईन टीम / गांधीनगर :

गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राजकुय वर्तुळातील घडामोडींनाही वेग चढू लागला आहे. काल नरेंद्र पटेल यांनी भाजपाला राम राम ठोकल्यानंतर आज निखिल सवानी यांनीही भाजपला रामराम ठोकला आहे.

‘नरेंद्र पटेलांना भाजपकडून एक कोटींची ऑफर दिल्याचे मी ऐकले. प्रचंड निराश झालो. मी आता भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे.’,असे निखिल सवानी यांनी सांगितले. शिवाय, भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप सोडण्याचे कारण भाजप केवळ लॉलिपॉप दाखवत आहे. आश्वासने पूर्ण करत नाही, असा आरोपही निखिल सवानींनी केला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ घेणार असून, त्यांना भेटल्यानंतर माझी पुढील वाटचाल स्पष्ट करेन, असेही निखिल सवानींनी सांगितले. दरम्यान, कालच पाटीदार समाजाचे नेते आणि हार्दिक पटेलचे आणखी एक निकटवर्तीय जाणारे नरेंद्र पटेल यांनीही एकाच दिवसात भाजपला राम राम ठोकला आहे. त्यानंतर आज निखिल सवानी भाजपमधून बाहेर पडले आहेत.