|Thursday, November 15, 2018
You are here: Home » Top News » कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा : देवेंद्र फडणवीस

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा : देवेंद्र फडणवीस 

ऑनलाईन टीम / अमरावती :

महाराष्ट्राची हिताची बाब असेल तर शरद पवार यांनी मतांची चिंता कधीच केली नाही. वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि चुका दुरूस्त करणारे शरद पवारच आहेत, असे म्हणत मुख्यमंत्री दवेंद फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

कपटी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. अमरावतीत शरद पवारांचा सर्वपक्षीय जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावर आयोजित सत्कारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अनेक सर्वपक्षीय ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

‘शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात शेती क्षेत्रात सर्वोतकृष्ट काम झाले. पवारांना संरक्षण खाते सहज मिळाले असतले. मात्र त्यांनी दहा वर्षे कृषी मंत्रालया संभाळले, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शद पवारांच्या कारकीर्दीचे कौतुक केले.शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही. मात्र सध्या कर्जमाफीची अत्यंत गरज होती. सरकारने जेव्हा कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा पवारांना फोन केला. चर्चेसाठी त्यांनी दिल्लीला बोलावले. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचेही नेते होते आणि भाजपचेही नेते होते.

 

Related posts: