|Thursday, January 17, 2019
You are here: Home » उद्योग » रिलायन्सचे बाजारमूल्य 6 लाख कोटीवर

रिलायन्सचे बाजारमूल्य 6 लाख कोटीवर 

वृत्तसंस्था / मुंबई

दिवाळीपूर्वी रिलायन्स जिओचा टॅरिफ प्लॅन महाग करण्यात आल्याचा फायदा रिलायन्स इन्डस्ट्रीजला दिसून आला. रिलायन्सचे पहिल्यांदाच बाजारमूल्य 6 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सोमवारी कंपनीचा समभाग 942 या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. यावेळी कंपनीच्या बाजारमूल्यात साधारण 20 हजार कोटी रुपयांची वाढ झाली. दिवाळीपूर्वी कंपनीचे बाजारमूल्य 5.80 लाख कोटी रुपये होते. रिलायन्स जिओने टॅरिफ दरात वाढ केल्याने त्याचा फायदा अन्य कंपन्यांनाही झाला आहे. आयडिया सेल्युलरचा समभाग 9 टक्के आणि भारती एअरटेलचा समभागात 5 टक्क्यांनी वधारला. याव्यतिरिक्त रिलायन्स कम्युनिकेशन्स 6.99 टक्के, टाटा कम्युनिकेशन्स 3.11 टक्के आणि एमटीएनएल 1.76 टक्क्यांनी मजबूत झाले. दुसऱया तिमाहीचा चांगला नफा आणि टॅरिफमध्ये वाढ करण्यात आल्याने कंपनीचा समभाग वधारत आहे. मात्र रिलायन्स जिओचा तोटा 21 कोटीवरून 271 कोटीवर पोहोचला आहे.

 

Related posts: