|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर डिंगणे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर डिंगणे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित 

प्रतिनिधी / बांदा:

 डिंगणे गावाला जोडणाऱया गाळेल ते डिंगणे या मुख्य मार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे तेथील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी 24 ऑक्टोबर रोजी पुकारलेले उपोषण पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या ठोस आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे डिंगणे शाखाप्रमुख नीलेश सावंत यांनी दिली. या बाबत लगतच्या काळामध्ये कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास सर्वपक्षीय ग्रामस्थांकडून पुन्हा बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. सोमवारी पालकमंत्री केसरकर यांची डिंगणेतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी त्यांची गोव्यात भेट घेतली.  यावेळी झालेल्या चर्चेअंती व पालकमंत्र्यांच्या ठोस आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.

 पंचायत समितीचे माजी सदस्य नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी ही भेट घेतली. यावेळी विभागीय संघटक सुशांत पांगम, प्रकाश परब, निखील मयेकर, डिंगणे शाखा प्रमुख नीलेश सावंत, सुहास सावंत, प्रदीप सावंत, राजन सावंत, सूर्यकांत सावंत, महादेव सावंत, यशवंत सावंत, विलास सावंत उपस्थित होते.

 पालकमंत्री केसरकर यांनी डिंगणे गाळेल हा चार कि.मी. लांबीच्या रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आराखडय़ामध्ये समाविष्ठ आहे. याबाबत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. या रस्त्यासाठी लागणाऱया वाढीव निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले.