|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » शेतकऱयांच्या मफत्यूला सर्वस्वी कृषी मंत्रालयच जबाबदार

शेतकऱयांच्या मफत्यूला सर्वस्वी कृषी मंत्रालयच जबाबदार 

प्रतिनिधी/ नागपूर

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विदर्भात अनेक शेतकऱयांचा मफत्यू झाला. शेतकऱयांच्या या मफत्यूला सर्वस्वी कृषी मंत्रालयच जबाबदार असल्याचा घणाघात करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. तसेच राज्य शासनाने कर्जमाफी नियोजन शून्य पद्धतीने केल्याचेही पवार म्हणाले.

सोमवारी अमरावती येथे पवार यांच्या नागरी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी 10 वाजता पवार यांचे नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरारराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. येथून ते अमरावतीकडे रवाना झाले. तत्पूर्वी, पत्रकारांशी बोलताना पवारांनी सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढले. राज्य सरकारने कर्जमाफीचा चांगलाच गाजावाजा केला. परंतु, प्रत्यक्षात कर्जमाफी करताना अनेक त्रुटी राहिल्या. ज्या शेतकऱयांनी कर्ज काढले नव्हते अशांना सरकार कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे झाले आहे. हे नियोजनशून्य कारभाराचे द्योतक आहे. यात सुधारणा करण्यासाठी आम्ही सरकारला 15 दिवसांचा वेळ देतो. याबाबत सुधारणा झाली तर ठीक अन्यथा पुढची दिशा ठरवावी लागेल, असा इशारा पवार यांनी यावेळी दिला.

कीटनाशक फवारणीमुळे झालेल्या शेतकऱयांच्या मफत्यूबाबतही त्यांनी सरकारला धारेवर धरले. कीटकनाशक नियंत्रणासाठी कायदा व संस्था आहे. संस्थेच्या परवानगीशिवाय कुठलेही कीटकनाशक बाजारात येऊ शकत नाही. आम्ही आमच्या काळात यासंदर्भातील नियमांचे काटेकोरपणे पालन केले. कंपन्यांनी नियमभंग केल्यास त्यावर कठोर कारवाई देखील केली. परंतु, गेल्या 3 वर्षात काय झाले माहित नाही. मोठय़ा प्रमाणात ‘नॉनसर्टीफाईड’ कीटनाशके बाजारात विक्रीसाठी आली. राज्यातील शेतकऱयांचे झालेले दुर्दैवी मफत्यू त्याचेच दुष्परिणाम आहेत. या प्रकरणात संबंधित दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. परतीच्या पावसामुळे विदर्भात सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाल्याने अशा परिस्थितीत नियम किंवा कायद्याच्या चौकटीत न अडकता सरकारने मार्ग काढून मदत जाहीर केली पाहिजे, असेही पवार म्हणाले.

Related posts: