|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जीएसटीमुळे बांधकाम समितीच्या सभेत चर्चेचा फार्स

जीएसटीमुळे बांधकाम समितीच्या सभेत चर्चेचा फार्स 

प्रतिनिधी/ सातारा

बांधकाम समितीच्या सभेत विविध बांधकामे मंजूर करण्याचे विषय अजेंडयावर होते. परंतु काही सदस्यांनी आहे तीच कामे जीएसटीमुळे होत नाहीत, नुसती मंजूरी घेवून उपयोग काय असा सुर आळवला. तर आरोग्य समितीच्या सभेत विकास कामांवर भर दिला गेला. तसेच इतर विषयावरही चर्चा झाली.

आरोग्य व बांधकाम विभागाच्या मासिक सभा उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. या सभेला जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, उषादेवी गावडे, शारदा ननावरे, शंकर जगदाळे, डॉ. अभय तावरे, डॉ. भारती पोळ, मारुती मोटे, भाग्यश्री मोहिते यांच्यासह सदस्य उपस्थित होते. आरोग्य समितीच्या सभेत अजेंडयावरील चार विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामाचा आढावा घेतेवेळी सर्व सदस्यांना विचारात घेवून कृती आराखडा तयार करण्यात यावा. 2017-18 मध्ये कोणत्याही सदस्यावर अन्याय होवू नये असा विषय मांडला. गरीब रुग्णांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. आर्थिक मदत लाभ देण्यासाठी नियोजन करण्यात यावी, अशाही सुचना मांडण्यात आल्या. तसेच बांधकाम समितीच्या सभेत बांधकामाचे विषय अंजेडयावर असल्याने त्यांना मंजूरी देवूनही उपयोग नाही. गतसभेत मंजूर झालेली कामे जीएसटीमुळे सुरु झाली नाहीत, अशी खदखद व्यक्त केली.

Related posts: