|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » 41 महिन्यात मोदींची 775 भाषणं !

41 महिन्यात मोदींची 775 भाषणं ! 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक उत्कृष्ट वक्ता असून त्यांनी प्रत्येक महिन्यात जवळपास 19 भाषणं दिली आहे. म्हणचेच 41 महिन्यात 775 भाषणं दिली आहेत. 24 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी दर तीन दिवसाला दोन भाषणं केली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांवर विरोधक नेहमी टीका करत असतात. पण तसे पहायला गेल्यास मोदींची संवादफेक, लोकांशी संवाद साधण्याचे कौशल्य, लगेच भाषण देण्याची क्षमता हे त्यांच्या लोकप्रियतेचे एक मुख्य कारण आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींच्या आतापर्यंत 775 सार्वजनिक सभा पार पडल्या असून त्यात भाषण दिले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषण देण्याच्या क्षमतेवर अनेक नेत्यांशी चर्चा केली, आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदी दर महिन्याला किमात 17 भाषणं करतात आणि ही भाषणं जवळपास अर्ध्या तासाहून जास्त असतात. राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बोलताना म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडं भाषण देण्याचे एक कौशल्य आहे. कोणत्याही मुद्यावर ते मनापासून बोलतात. आपल्याकडे ज्ञान आणि मुद्दा एकत्रित करून सर्वांसमोर ठेवण्याचे कौशल्य हे त्यांना मिळालेले गॉड गिफ्ट आहे’