|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

उद्या शनिचा धनु राशित प्रवेश

बुध. दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2017

ग्रहमालेतील बलाढय़ व न्यायाधीशपद मिरविणारा शनि ग्रह दि. 26 ऑक्टोबरला धनु राशीत प्रवेश करील. धनु राशीतील मूळ नक्षत्रात पहिल्या चरणात ऍक्मयूलीयस या शक्तीशाली तारकापुंजात तो प्रवेश करील. चंद्र, मंगळाचे गुणधर्म असलेला हा तारकपुंज आहे. या तारकापुंजात ज्याज्यावेळी शनि मंगळासारखे मोठे ग्रह प्रवेश करतात. त्या त्या वेळी जगात हाहाकार, अपघात, दुर्घटना ज्वालामुखीचे स्फोट, जमीन दुभंगणे, त्सुनामी लाटा येणे, समुद्रात काही शहरे बुडणे अथवा समुद्राखालील काही भाग वर येणे, धुमकेतुचे आगमन. आगीच्या दुर्घटना, भयानक स्फोट व त्यात असंख्य मृत्यू भूकंप तसेच नैसर्गिक प्रलयासारख्या घटना घडतात. उपलब्ध आकडेवारी अथवा गणितानुसार 26 डिसेंबरपर्यंत व नंतर 2 मार्चपर्यंत याचा अनुभव येऊ शकेल. या कालखंडात डोळय़ांचे विकार दृष्टिदोष अंधत्व, काचबिंदू व डोळय़ांना इजा होण्याची शक्मयता असते. काही जणांची आर्थिक भरभराट होते. तर काही जणांना हा शनि रसातळाला पोचवितो. उपजिविकेचे मार्ग बदलतात. कोर्ट पोलीसप्रकरणाशी संबंध येतो राजकारणात व समाजकारणात असलेल्यांना हा शनि एकतर अत्युच्च पदावर नेईल अथवा दाणदिशी खाली आपटेल. ज्योतिष शास्त्रावर  प्रभुत्व असलेले सिद्धहस्त लेखक श्री. म. दा. भट तसेच द्वारकानाथ राजे यांच्या बऱयाच पुस्तकात या शनिबद्दल सविस्तर माहिती मिळू शकते. शनि हा मुळात वाईट नाही तो कर्माचा अधिपती आहे. ज्याचे जसे कर्म असेल त्यानुसार चांगले वाईट फळ तो देईल त्यात तो कोणतीही हयगय करणार नाही. माणसाच्या पापपुण्याईचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त म्हणजे शनि. आपण जरी चांगले असलो तरी आपले वाडवडिल, आजोबा, पणजोबा यानी जी काही बरी वाईट कृत्ये केलेली  असतील त्याचे फळ हा शनी देतो. शनिची साडेसाती म्हणताच मी मी म्हणणारेही दचकतात ज्याला साडेसाती वाईट जाते त्याचे कारण स्वत:च्या अथवा वाडवडीलांच्या कर्मात स्पष्ट दिसून येते. साडेसाती असतानाच अनेकजण यशाच्या सर्वोच्च शिखरावर चढलेले पहाण्यात आहेत तुळेची साडेसाती पूर्णपणे संपते तर वृश्चिक, धनु, मकर या तीन राशीना साडेसाती राहील. प्रत्येक राशिला या शनिची फळे कमी जास्त  प्रमाणात कशी मिळतील याचा अंदाज पुढे दिलेला आहे. शनि बदलल्यावर ताबडतोब त्याची चांगली वाईट फळे मिळत नाहीत तर शेवटच्या सहा महिन्यात त्याचे अनुभव विशेष प्रकर्षाने जाणवतात. एका राशित  त्याचे वास्तव्य अडीच वर्षे असते. ज्या राशित तो असेल त्याच्या पुढील व मागील राशिवर त्याचा बरा वाईट प्रभाव पडतो. त्याशिवाय चवथा, पाचवा, सातवा या स्थानातील  शनिचाही त्रास होतो शनिची पूजा अर्चा जपजाप्य व शांती हे विषय प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार कमी जास्त फळ देतात. त्याहीपेक्षा स्वत:चे कर्म स्वच्छ ठेवणे कुणावर अन्याय न करणे दैनंदिन कामे व्यवस्थित करणे कुणालाही अपशब्द बोलून वाईटपणा घेवू नये वगैरे बाबींवर लक्ष   दिल्यास शनिचा कोणताही त्रास होत नाही काही राशिना शनिचे दर्शन पूजन अजिबात चालत नाही हे पण लक्षात ठेवावे.

मेष

मित्रमंडळीसाठी बराच खर्च होईल. जबाबदारी वाढेल पण त्या  प्रमाणात पैसा मिळणार नाही. हॉटेल, धाबा, मिठाईचा व्यवसाय, अकौंटंन्सी तसेच लोखंडाशी संबंधित असाल तर चांगला फायदा होईल. लढाई झगडे दंगल यापासून दूर रहाणे आवश्यक समजावे. लिखाणात चांगले यश मिळवून देईल. घरात चुकूनही अपशब्द काढू नका. अन्यथा त्याचे वास्तुवर अनिष्ट परिणाम जाणवतील वाहन घेण्याची इच्छा पूर्ण होईल.


वृषभ

शनि पुढील अडीच वर्षापर्यंत आठव्या स्थानी आहे. त्रासदायक योग. कोणत्याही मोठय़ा आजाराला निमंत्रण मिळेल,असे वागू नका. सर्व बाबतीत सावध रहावे. भावंडांशी मतभेद टाळावेत, सरकारी अधिकाऱयांशी वितंडवाद घालू नका. अंगलट येईल. या शनिच्या कालखंडात कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नका. कष्ट वाढले तरी वैभव ऐश्वर्य या दृष्टीने चांगली फळे मिळतील. लाचलुचपत  व दुर्गंधीयुक्त रसायने यापासून दूर रहावे.


मिथुन

शनिचे वास्तव्य आगामी अडीच वर्षे सप्तमात राहणार आहे. बाधिक पीडा व शत्रुपीडेचा त्रास होणार नाही. कुणी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावरच उलटेल. नोकरी उद्योग क्षेत्रात असाल तर चांगले यश मिळेल. भावंडांशी मतभेद होऊ शकतील. काही महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. अपघात व दुर्घटनेपासून तुम्हाला सावध रहावे लागेल. वैवाहिक जीवनावर प्रभाव पडेल.


कर्क

 शनि अडीच वर्षे सहाव्या स्थानी राहणार आहे. शत्रुभावनेने पहात असलेले लोक थंड पडतील. करणीबाधेसारखे अनिष्ट प्रयोग चालणार नाहीत. भावंडे असतील तर त्यांच्या चुकांमुळे शत्रुत्व निर्माण करतील. प्रत्येक कामात अडचणी येण्याची शक्मयता आहे. जुन्या लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे अथवा कुणी दिल्यास नुकसान होण्याची शक्मयता आहे. यासाठी सावध रहा. नदी, ओहोळ वगैरे ठिकाणी सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा.


सिंह

शनिमहाराज पंचमस्थानी राहणार आहेत. अडीच वर्षापर्यंत त्याचा कालखंड राहील. अपघात, आजार, शत्रुत्व बाधा व प्रत्येक कामात अडथळे येतील. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा शनि चांगले फळ देईल. बोलण्या चालण्यात जरा सावधानता बाळगावी लागेल. घर घ्यायच्या बेतात असाल तर मुला मुलींच्या नावाने घर घेतल्यास चांगले ठरेल. मुलांना व्यसन असेल तर संपत्ती व घरादाराचा गंभीर प्रश्न निर्माण करतील.


कन्या

दूरवरचे प्रवास तीर्थयात्रा घडू शकतील. परदेशातून धनलाभ, नोकरी नसणाऱयांना चांगली बातमी कळेल. संतती संदर्भात शुभवार्ता समजतील. मुलाबाळांचे चांगले सहकार्य मिळेल. तुमची प्रति÷ा वाढवील. लग्नाचे बंध जुळतील. मानमरातब्बही  प्राप्त कराल. घरातील वातावरण शुद्ध व पवित्र ठेवावे. व्यसने असतील तर ती सोडावीत. विवाहाचे योग येतील. पण गैरसमजामुळे ठरलेले लग्न अथवा साखरपुडा यात गोंधळ शक्मयता.


तुळ

उद्यापासून साडेसाती पूर्ण संपत आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली अनेक कामे होऊ लागतील. आर्थिक अडचणी कमी होतील. विवाहाचे प्रश्न मार्गी लागतील. शारीरिक आजार कमी होतील. कुंटुंबात शुभ घटना घडू लागतील. जुनाट व गंजलेल्या वस्तू बाहेर काढल्यास शनिची शुभ फळे मिळतील. दुरावलेल्या व्यक्ती पुन्हा आयुष्यात येतील.


वृश्चिक

संतती, धनलाभ व भाग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. मुलाबाळांचा भाग्योदय व संसारिक सुखाच्या दृष्टीने उत्तम.अनेक गूढ समस्यांवर मात कराल. एखादी नवी व्यक्ती आयुष्यात येईल. धनस्थानी शनि असल्याने आर्थिक अडचणी जरा वाढतील. खर्चावर नियंत्रण आवश्यक. गुप्त शत्रुंच्या कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल.


धनु

ज्या क्षेत्रात असाल त्यात नेत्रदीपक प्रगती करून दाखवाल. साडेसातीची प्रखरता विशेष जाणवणार नाही. विवाहाच्या बाबतीत जर पूर्वीच लग्न ठरवून ठेवलेलं असेल तर त्यात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. वास्तुच्या बाबतीत चांगले योग. घर, जागा, दुकान, फ्लॅट वगैरे घेणार असाल तर कोणत्याही मोठय़ा अडचणी येणार नाहीत.


मकर

आर्थिक बाबतीत अनुकूल योग असल्याने नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. स्वतंत्र उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. मुलाबाळांच्या दृष्टीने खास योग नाहीत. विद्यार्थ्यांनी इतर अवांतर बाबी टाळून अभ्यासाकडे लक्ष देणे त्यांना हितावह ठरेल. शिक्षण अर्धे झाले असेल तर कुणाच्या तरी मदतीने ते पुन्हा सुरू करू शकाल.


कुंभ

आर्थिक स्थिती चांगली पण अस्थिर राहील. काहीवेळा अनपेक्षित मोठा फायदा होईल. अपघात, आजार व गंडांतरे दिसतात. काळजी घ्यावी. गुरुच्या शुभयोगामुळे सांपत्तिक स्थिती सुधारेल. सहज व साध्यासुध्या बोलण्यातून प्रेमप्रकरणे निर्माण होतील. बाधिक ठिकाणे बाधतील. निष्कारण आळ येण्याची शक्मयता.


मीन

आर्थिक परिस्थितीत झपाटय़ाने सुधारणा ज्या क्षेत्रात असाल त्यातून संपत्ती मिळेल. आपल्या विद्वतेमुळे व वक्तृत्वामुळे लोकांवर प्रभाव पाडाल… व्यवसाय धंद्याची भरभराट होईल. नोकरीत असाल तर अधिकार योग येईल. उद्योग व्यवसायात वाढ करू शकाल. पण आळशीपणा व बेसावध वृत्ती ठेवल्यास नुकसान होऊ शकते. त्यासाठी कोणतेही काम करताना जास्तीत जास्त काळजी घ्या.

Related posts: