|Thursday, April 18, 2019
You are here: Home » उद्योग » व्होडाफोनकडून 999 रुपयांत 4जी स्मार्टफोन

व्होडाफोनकडून 999 रुपयांत 4जी स्मार्टफोन 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जिओ आणि एअरटेलने किफायतशीर दरात 4जी फोन दाखल केल्यानंतर आता व्होडाफोननेही स्वस्त फोन बाजारात उतरला आहे. व्होडाफोन-आयडियाने मायक्रोमॅक्स या मोबाईल उत्पादक कंपनीबरोबर भागीदारी करत 999 रुपयांत फोन सादर केला. देशातील सर्वात स्वस्त 4जी स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. यापूर्वी एअरटेलने कार्बनबरोबर भागीदारीत 1,399 रुपयांत स्मार्टफोन दाखल केला आहे. सर्वात प्रथम जिओने 1500 रुपयांत बेसिक फोन आणला होता.

व्होडाफोनकडून ग्राहकांना 999 रुपयांत मायक्रोमॅक्सचा भारत-2 हा फोन देण्यात येईल. गुगल प्रमाणित असणारा मायक्रोमॅक्स भारत 2 अल्ट्रा हा फोन फुल टच स्क्रीन आणि डय़ुअल सिमची सेवा देतो. गुगल प्ले स्टोअर्सवरील सर्व ऍपना साहाय्य करण्याची क्षमता आहे. हा फोन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना प्रतिमाह 150 रुपयांचा प्लॅन खरेदी करावा लागेल. या प्लॅनमध्ये किती डेटा आणि कॉलिंग असेल याची माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही.

कंपनी या फोनची किंमत 999 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र ही इफेक्टिव्ह किंमत आहे. व्होडाफोनने एअरटेलप्रमाणे हा फोन दाखल केला आहे. हा फोन घ्यायचा असल्यास 2,899 रुपये डाऊन पेमेन्ट करावे लागेल. याव्यतिरिक्त पुढील 36 महिने 150 रुपयांचे मासिक रिचार्ज करावे लागेल. फोन खरेदीनंतर 18 महिन्यानंतर 900 रुपये कॅशबॅक मिळतील. उर्वरित 1000 रुपये 36 महिन्यानंतर देण्यात येतील. अशाप्रकारे 36 महिन्यांमध्ये 1900 रुपये परत देण्यात येतील आणि फोन 999 रुपयांना मिळेल.

गेल्या आठवडय़ात बीएसएनएलने मायक्रोमॅक्सबरोबर भागीदारी करत भारत 1 हा फोन दाखल केला होता.

Related posts: