|Friday, May 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना मातृशोक

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांना मातृशोक 

नवी दिल्ली

 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांना मंगळवारी मातृशोक झाला. जावडेकर यांच्या मातोश्री रजनी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जावडेकर यांच्या सहकाऱयाने याविषयी माहिती दिली. रजनी यांच्यावर दिल्लीच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  92 वर्षीय रजनी जावडेकर यांनी महाराष्ट्राच्या रायगड आणि पुणे येथे शिक्षिका म्हणून काम पाहिले होते. त्यांच्यामागे दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. राम मनोहर लोहिया रुग्णालयात सकाळी 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले. जावडेकर यांचे सांत्वन करण्यासाठी अनेक महनीयांनी धाव घेतली.

 

 

 

Related posts: