|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कुरूंदवाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपी ताब्यात

कुरूंदवाडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; आरोपी ताब्यात 

प्रतिनिधी/ कुरूंदवाड

चॉकलेट साठी पैसे देण्याचे अमिष दाखवून एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना कुंरुदवाड येथे मंगळवार 24 रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन भाऊ तोरसकर (वय 42, रा.घालवाड) याला अटक केली आहे.

कुरूंदवाड येथील गिरीष सिनेमा परिसरात आरोपी व पीडित मुलीचे कुटूंब  भाडय़ाच्या घरात राहायला आहे. संशयित आरोपी अर्जुन भाऊ तोरसकर हा एका हॉटेल मध्ये वेटरचे काम करतो. 14  ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा च्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून अजुन तोरसकर यांने चॉकलेट साठी पैसे आणण्याचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीने ही महिती आपल्या आईला सांगितल्यावर याबाबत कुरूंदवाड पोलिसात वर्दी देण्यात आली आहे. यानुसार पोलिसांनी कलम 376 अन्वय गुन्हा दाखल करून आरोपीला सायंकाळी ताब्यात घेतले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत.

कुरूंदवाडात सारख्या शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना घडल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

Related posts: