|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णात पाटील बिनविरोध

बाजार समितीच्या सभापतीपदी कृष्णात पाटील बिनविरोध 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णात वसंतराव पाटील (सांगावकर) यांची बिनविरोध निवड झाली. समितीच्या मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी राधानगरीच्या प्रांताधिकारी मनिषा कुंभार होत्या. निवडीनंतर पाटील समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळन करीत जल्लोष  केला.

बाजार समितीत राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आघाडी अंतर्गत ठरल्यानुसार पधरा दिवसापूर्वी सर्जेराव पाटील- गवशीकर यांनी राजीनामा दिला होता. यंदा राष्ट्रवादीच्या वाटय़ाल सभापतीपद येणार होते. उपसभापतीपद कागलच्या आशालता पाटील यांच्याकडे असल्याने अन्य तालुक्याला संधी द्यावी अशी मागणी पुढे आली होती. सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर रविवारी विश्रमगृह येथे आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री विनय कोरे, के. पी. पाटील यांची बैठक झाली. पक्ष निष्ठेच्या निकषावर कृष्णात पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

मंगळवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. सभापतीपदासाठी कृष्णात पाटील यांनी अर्ज दाखल केला. त्यांचे नाव परशुराम खुडे यांनी सूचवले. विलास साठे यांनी अनुमोदन दिले. एकमेव अर्ज दाखल झाल्याने सभापतीपदी पाटील यांची बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा कुंभार यांनी केली. यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली.

कोल्ड स्टोअरेजचे काम मार्गी लावणार- कृष्णात पाटील

निवडीनंतर बोलताना पाटील म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ, सेतज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, विनय कोरे, संपतबापू पवार- पाटील यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवू, शेतकऱयांचा प्रतिनिधी असलो तरी बाजार समितीतील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका असेल. गेल्या काही वर्षापासून कोल्डस्टोअरेजचा प्रश्न लांबणीवर पडत आहे. शासनाकडे पाठपुरावा करून कार्यकाळात निश्चितपणे काम पुर्ण करू. त्याचबरोबर 10 कोटी ठेवीचा टप्पा पार करू असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी संचालक नंदकुमार वळंजू, भगवानराव काटे, विलास साठे, बाबा लाड, सदानंद कोरगावकर, ऍड. किरण पाटील, ए. डी. पाटील, अमित कांबळे, नाथाजी पाटील, सर्जेराव पाटील, शेतकरी संघाचे चेअरमन युवराज पाटील, माजी संचालक एम. एम. पाटील, आदींनी मनोगत व्यक्त केले.

Related posts: