|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्राधिकरणाचा कामकाजाचे तीन-तेरा

प्राधिकरणाचा कामकाजाचे तीन-तेरा 

प्रतिनिधी/ सातारा

महाराष्ट्र जीवन प्रधिकरण कार्यालयात प्लंबर, फिटर, मेटेरियल, नाहीत. ज्या ठेकेदारांनी नेमलेली माणसे दिवाळीच्या सुट्टीवर असल्याने ही गळती तसेच दुरूस्ती कुणाकडून काढून घ्यायची असा प्रश्न प्राधिकरणाच्या अधिकांऱयापढे उभा राहिला आहे? ज्यामुळे कामकाजाचे तीन-तेरा अशी अवस्था झाली आहे.

संभाजीनगर ग्रामपंचायत अंतर्गत बारावकरनगरमध्ये दूषित पाण्यामुळे साथरोगाची लागण झाली आहे. प्राधिकरणामार्फत एका ठिकाणची गळती काढण्यात आली. मटेरियल संपल्याने ते कोल्हापूरहून आल्यानंतर दुसऱया दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सातारा विभागाकडे पाणीपुरवठयाबरोबर देखभाल व दुरूस्तीच्या कामाची जबाबदारी आहे. अशा ठिकाणी ही कामे करण्यासाठी स्वत:चा पुरेसा कर्मचारी वर्ग व साहित्य असणे गरजेचे आहे. मात्र ही कामे मक्तेदाराकडून करून घेण्यात येतात.परिणामी वेळच्या वेळी कामे होण्याला मर्यादा पडत आहेत. गेल्या काही वर्षात देखभाल, दुरूस्तीच्या कामांसाठी नव्याने कर्मचारी वर्ग नेमला गेला नाही. या विभागातील कर्मचारी निवृत्त होत गेले. त्यांच्याजागी नवीन कर्मचारी आले नाहीत. परिणामी देखभाल, दुरूस्तीच्या कामांसाठी मक्तेदारावर अवलंबून राहवे लागत आहे.

शाहुपूरी, सदरबाझार कंरजे, शाहूनगर, संभाजीनगर, खेड- संगमनगर हे विभाग सातारा शहराच्या चार टोकांना आहेत. पाणीपुरवठयाच्या दृष्टीने प्राधिकरणांतर्गत हा भाग असल्याने मक्तेदारामार्फत नेमलेली यंत्रणा अपुरी असल्याने ती कुचकामी ठरत आहे. शाहुपूरी व सदरबाझारमध्ये अद्यापि गळत्यांची संख्या मोठी आहे. त्यातच जलवाहिनी गळतीची एखादी मोठी घटना घडल्यास मक्तेदाराला सर्व कामे बाजूला ठेवून पळावे लागले. मक्तेदाराच्या कार्मचाऱयांच्या सुट्टया, त्यांच्या कामाच्या वेळा या गोष्टीही पाहाव्या लागतात. त्यामुळे प्राधिकरणाचे कर्मचारी पुरेशा क्षमतेने काम करू शकत नाहीत, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

Related posts: