|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दिवाळी संपली तरी खरेदीला जोर

दिवाळी संपली तरी खरेदीला जोर 

बाजरात पेठेत अजून गर्दी : वस्तुच्या मागणीत वाढच वाढ

प्रतिनिधी/ सातारा

दिवाळी सणामध्ये सोने, कपडय़ापासून ते सजावटीच्या साहित्यापर्यंत महिन्याआधी खरेदीला सुरूवात केली जाते, तर जस-जसी दिवाळी जवळ येईल तशी शहरातील बाजारापेठा ही गजबजलेल्या असतात. मात्र, आता दिवाळी संपली असली तरी बाजारपेठेत लोकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे.

  दिवाळी सण काळात सातारकर बाजारपेठेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरेदीसाठी प्राधान्य देत होते. मात्र, सध्या दिवाळी संपली  असली तरी बाजारपेठेत तितकीच लगबग पहायला मिळत  आहे. सध्या सुट्टीचे दिवस सुरू आहेत. दिवाळीत शाळा, कॉलेज तसेच ऑफिसला सुट्टी असते. या दिवसात आपल्या कुटुंबासहीत फिरायला जाण्याचे नियोजन करतात. ज्यामुळे फिरायला जाताना आपल्या प्रवासात सुट होतील असे कपडे घालण्याची अपेक्षा प्रत्येकांची असते. म्हणून त्यांची खरेदी आता दिवाळी झाल्यावर केली जाते. ज्यासाठी आता कपडयाच्या दुकांनात गर्दी होत आहे.

खरेदीवर जीएसटी चा प्ररिणाम नाही

जीएसटी लागु झाला तरी खरेदीवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. दिवाळीत आणि नंतर बाजारपेठा गर्दीने फुलुन गेलेल्या दिसत आहेत. आधी सणासाठी खेरदी आता फिरायला जाण्यासाठी खरेदी केली जात आहेत. ज्यामुळे शहरातील बाजारपेठेत बाराही महिने गर्दी दिसत आहे.

Related posts: