|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » उद्योग » घसबसल्या लिंक करा मोबाईल क्रमांक-आधार

घसबसल्या लिंक करा मोबाईल क्रमांक-आधार 

नवी दिल्ली

 मोबाईल क्रमांकाला आधारबरोबर जोडणी करण्याची प्रक्रिया सरकारकडून सोपी करण्यात येत आहे. पुनर्पडताळणीसाठी ही प्रक्रिया सहजसोपी करण्यात येणार आहे आणि ग्राहकांना घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारबरोबर संलग्न झाल्याची पडताळणी करता येणार आहे. ही प्रक्रिया सहज करण्यासाठी सरकार वन टाईम पासवर्ड आणि घरामध्ये पुनर्पडताळणीची सुविधा देणार आहे. आतापर्यंत ग्राहकांना मोबाईल क्रमांक आधारबरोबर जोडण्यासाठी सेवा केंद्राला भेट देण्याची आवश्यकता होती.

मोबाईल आणि आधार जोडणीची पडताळणी करण्यासाठी ग्राहकांच्या घरी सेवा उपलब्ध करण्यात यावी असे आदेश मोबाईल सेवा कंपन्यांना देण्यात येतील. याचा फायदा वरिष्ठ नागरिक, आजारी आणि दिव्यांग लोकांना होईल. ऑनलाईन पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी आणि ग्राहकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागता नये असे सांगण्यात आले आहे. नवीन ग्राहकांना सिम खरेदी करताना आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे, मात्र जुन्या ग्राहकांसाठी सिम कार्ड आधारबरोबर जोडावे लागणार आहे.