|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारतमाला प्रकल्प : रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी होणार

भारतमाला प्रकल्प : रस्ते दुर्घटनांचे प्रमाण कमी होणार 

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींचा दावा : प्रवासवेळ 25 टक्क्यांनी घटणार, सर्व राज्यांना होणार मोठा लाभ

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली

 भारतमाला प्रकल्पामुळे महामार्गावर होणाऱया दुर्घटनांच्या प्रमाणात 50 टक्क्यांची घट होईल, तसेच प्रवासाचा कालावधी 25 टक्क्यांनी घटणार असल्याचे वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी केले. मंगळवारीच भारतमाला प्रकल्पासमवेत जवळपास 83 हजार किलोमीटर रस्तेप्रकल्पांना मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. रस्ते प्रकल्प जवळपास सर्व राज्यांना व्यापणार असून रस्त्यावरील वाहतुकीला सुस्वरुप प्राप्त होईल. भारतमाला प्रकल्प महामार्ग क्षेत्रासाठी वरदान ठरेल असे उद्गार गडकरींनी काढले.

   भारतमाला प्रकल्पावर जवळपास 5.35 लाख कोटी  खर्च होणार असून यात 34800 किलोमीटरचा महामार्ग तयार केला जाईल. पहिल्या टप्प्यात 24800 किलोमीटरचा मार्ग तयार होईल. तर एनएचडीपी अंतर्गत 10 हजार किलोमीटरचा रस्ता निर्मिला जाणार आहे. पहिल्या टप्प्याच्या भारतमाला प्रकल्पात 9000 किलोमीटरचा आर्थिक पट्टा सामील असेल, ज्यावर 1.20 लाख कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याची माहिती गडकरींनी दिली.

अनेक शहरांमध्ये रिंगरोड

28 शहरांमध्ये रिंगरोड निर्माण केले जाणार आहेत। हे रिंगरोड राष्ट्रीय महामार्गाशी जोडले जातील. याशिवाय कोंडी होणाऱया 125 ठिकाणांची ओळख पटविण्यात आली असून तेथे रिंग रोड, महामार्ग विस्तार, उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. भारतमाला प्रकल्पात रस्त्यांवरील कोंडी कमी करण्याची योजना सामील असल्याचे वक्तव्य केंद्रीय रस्ते आणि वाहतूक सचिव युद्धवीर सिंग मलिक यांनी केले.

लॉजिस्टिक पार्क

मंत्रालयाने 35 शहरांमध्ये लॉजिस्टिक पार्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला. यातील काही प्रकल्पांसाठी काम देखील सुरू झाले. दिल्ली-एनसीआर, मुंबई, उत्तर गुजरात, हैदराबाद, दक्षिण गुजरात, दक्षिण पंजाब, उत्तर पंजाब, जयपूर, बेंगळूर, पुणे, विजयवाडा, चेन्नई, नागपूर, इंदोर, पाटणा, कोलकाता, अंबाला, वलसाड, कोईम्बतूर, जगतसिंगपूर, नाशिक, गुवाहाटी, कोटा, पणजी, हिस्सार, विशाखापट्टणम, भोपाळ, सुंदरगढ, भटिंडा, सोलन, राजकोट, रायपूर, जम्मू, कांडला आणि कोची या शहरांमध्ये असे पार्क निर्माण होतील.

अन्य महत्त्वाच्या योजना

6000 किलोमीटरचा  इंटर तसेच फीडर कॉरिडॉर      80 हजार कोटींचा खर्च.

5000 किमी नॅशनल कॉरिडॉर एफिशिएन्सी इम्पूव्हमेंट           1 लाख कोटांचा खर्च

2000 किलोमीटरचा आंतरराष्ट्रीय संपर्क मार्ग            25 हजार कोटींचा खर्च

2000 किमीचा किनारी मार्ग, बंदरसंपर्क व्यवस्था      20 हजार कोटींचा खर्च

800 किलोमीटरचा हरित पट्टा महामार्ग. 40 हजार कोटी खर्च होणार

Related posts: