|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रणॉय, प्रणीत दुसऱया फेरीत

प्रणॉय, प्रणीत दुसऱया फेरीत 

वृत्तसंस्था/ पॅरिस

भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय व बी. साई प्रणीत यांनी फ्रेंच ओपन सुपरसिरीज स्पर्धेत विजयी सलामी देत एकेरीची दुसरी फेरी गाठली.

अमेरिकन ओपन चॅम्पियन प्रणॉयने डेन्मार्क ओपनचा उपविजेत्या 37 वषीय ली हय़ुन द्वितीयचा 21-15, 21-17 असा पराभव केला तर प्रणीतने थायलंडच्या खोसित फेतप्रदाबचे आक्हान 21-13, 21-23, 21-19 असे संपुष्टात आणले. प्रणीतची पुढील लढत तीनवेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन मलेशियाच्या ली चाँग वेईशी होणार आहे. ली जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे. प्रणॉयने या मोसमात ली चाँग वेईवर दोनदा मात केली असल्याने त्याचे मार्गदर्शन प्रणीतला उपयुक्त ठरू शकते. प्रणॉयची पुढील लढत डेन्मार्कच्या हान्स क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसशी होईल.

प्रणव जेरी चोप्रा व एन.सिक्की रेड्डी या मिश्र दुहेरीच्या जोडीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या टोन्टोवी अहमद व लिलियाना नात्सिर या चौथ्या मानांकित जोडीकडून 15-21, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.