|Monday, July 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उदगावमध्ये जयसिंगपूरच्या ऊस परिषद निमित्त नियोजन मेळावा

उदगावमध्ये जयसिंगपूरच्या ऊस परिषद निमित्त नियोजन मेळावा 

वार्ताहर/ उदगाव

गेली 15 वर्षे सातत्याने खासदार राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या माध्यमातून संघर्ष करून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळवून दिला आहे. यंदा ऊस उत्पादन क्षेत्र कमी असल्याने तसेच अवकाळी पावसाचा फटका बसल्याने ऊसाला जास्त दर नक्कीच मिळेल, यासाठी 28 रोजी जयसिंगपूर येथे होणाऱया ऊस परिषदेस मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी केले.

28 रोजी होणाऱया ऊस परिषदेच्या तयारी निमित्ताने येथील श्री कल्लेश्वर मंदिर येथे सावकर मादनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन व मार्गदर्शन मेळावा झाला. यावेळी ऊस परिषदेसाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक पायगोंडा पाटील होते.

सावकर मादनाईक म्हणाले, ऊस परिषदेवर हक्क हा खासदार राजू शेट्टींचा आहे. त्यांच्या अथक परिश्रम व आंदोलनामुळे ऊस उत्पादकांना सुगीचे दिवस येत आहेत. ऊस परिषदेमुळे सातत्याने ऊस उत्पादकांना दर मिळत आहे.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष प्रा. राजाराम वरेकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत हजारे आदींची भाषणे झाली.

स्वागत व प्रास्ताविक युवा अध्यक्ष गुंडा कोरे यांनी केले. सरपंच सौ. सविता ठोमके, सदस्य पुजा कोळी, सलमा नदाफ, पंकज मगदूम, प्रेमनिहाल रांजणे, संदीप पुजारी, मनु पुजारी, दिलीप गुरव, शिलकुमार चौगुले, बंडेश साखळे, शांताराम पाटील, श्रीकांत चौगुले, हिरासिंह रजपूत, मेघराज वरेकर, देवगोंडा चौगुले, श्रेणिक मादनाईक, उपसरपंच शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार माजी उपसरपंच प्रकाश बंडगर यांनी मानले.

Related posts: