|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संजय गांधी निराधार समितीवर उमेश देसाई यांची निवड

संजय गांधी निराधार समितीवर उमेश देसाई यांची निवड 

प्रतिनिधी/सेनापती कापशी

कोल्हापूर जिल्हय़ातील तालुकास्तरीय संजय गांधी निराधार समितीवर सामाजिक कार्यकर्ते उमेश शामराव देसाई (सेनापती कापशी)यांची निवड करण्यात आली. या निवडीने देसाई यांच्या सामाजिक कार्याला आणखीन बळ मिळणार आहे. उमेश देसाई यांची शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शिफारशीनुसार सदरची निवड करण्यात आली असून यासाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. उमेश देसाई हे समरजितसिंह घाटगे गटाचे कट्टर समर्थक असून या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 उमेश देसाई यांना सामाजिक कार्याची फार आवड आहे. त्यांनी अनेक रूग्णांना मदत केली आहे. तसेच त्यांनी शालेय विद्यार्थ्याकरिता शालेय साहित्याचे वाटप करून एक होतकरू विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी बळ दिले आहे. तसेच       प्राथमिक शाळांनाही मदत केली आहे. शाहू गुपचे अध्यक्ष, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी जलयुक्त शिवार अभियानाची घोषणा केल्यानंतर चिकोत्रा खोऱयात उमेश देसाई यांनी या कामाला वाहून घेतले आहे. शिवाय पाण्याविषयी कायमपणे पोटतिडकीने ते बोलत असतात. या निवडीने त्यांना गोगरीबांची कामे करण्याची संधी मिळणार आहे.

 

Related posts: