|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजच्या विठ्ठल मंदिरात दशावतार महापूजा

गडहिंग्लजच्या विठ्ठल मंदिरात दशावतार महापूजा 

गडहिंग्लज

: येथील विठ्ठल मंदिर गडहिंग्लज येथे अश्विन कार्तिक काकडा आरती सोहळय़ानिमित्त श्री विठ्ठलास दशावतार पूजा 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर अखेर आयोजित केली आहे. सोमगोंडा देसाई, भिकाजी चव्हाण, तानाजी डोमणे, सदाशिव लोहार यांनी देवाची मत्स्यावतार रूपात पूजा बांधली. यानिमित्त दररोज पहाटे काकड आरती व सायंकाळी भजन, आरती असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंगळवार दि. 31 रोजी कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त श्रींच्या मूर्तीस सामुदायिक श्रीखंड अभिषेक तसेच 5 नोव्हेंबर रोजी गोपाळकाला व दिंडी सोहळा होणार असून या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts: