|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » नाईट कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश

नाईट कॉलेजचे कुस्ती स्पर्धेत यश 

प्रतिनिधी/ इचलकरंजी

 येथील दे. भ. बा. भा. खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेज ऑफ आर्टस ऍण्ड कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेमध्ये यश संपादन केले. यामध्ये 125 किलो वजनी गटात शुभम सिदनाळे याने प्रथम क्रमांक तर 70 किलो वजनी गटात शुभम भोसले याने व्दितीय क्रमांक पटकाविला. जयवंत महाविद्यालय यांच्यावतीने स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्थेचे चेअरमन अरूण खंजिरे, उपाध्यक्ष बी. एस. मुरदंडे, सेक्रेटरी शेखर पाटील, खजिनदार प्रदीप गोलंगडे, प्राचार्य डॉ. पुरंदर नारे, अमृत भोसले व क्रिडा शिक्षक संचालक देवेंदे बिरनाळे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

    

Related posts: